मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !

‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे ‘मेवात’ हे ठिकाण ! येथे वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे मेवातमधील परिस्थितीचे सविस्तर वर्णन दिले आहे. मेवात हे भारताच्या राजधानी देहलीपासून केवळ ११४ किलोमीटर अंतरावर आहे. गुडगावपासून अलवरच्या मार्गाने पुढे गेल्यावर सोहना या भागानंतर ‘मेवात’चा भाग चालू होतो. मेवात एक मुसलमानबहुल भाग आहे. येथे ‘मेव’ जातीच्या मुसलमानांचा दबदबा आहे. हे मेव पूर्वी हिंदूच होते. ‘मेव’ ही एक जात आहे. आताही काही मेव हिंदू आहेत. मेवातचा भाग हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या प्रदेशात पसरलेला आहे. १४ व्या शतकात तुघलक वंशाच्या राज्यकाळात मेवातच्या लोकांना बळजोरीने मुसलमान बनवण्यात आले. नंतरही हे लोक अनेक वर्षांपर्यंत स्वतःची ओळख जपून ठेवण्यात यशस्वी झाले होते; परंतु वर्ष १९२० नंतर विशेषतः शरियत कायदा वर्ष १९२७ मध्ये झाल्यानंतर मुसलमानांच्या संघटनांनी तेथील हिंदूंचे धर्मांतर करण्याचे कार्य वेगात आरंभ केले. याचा दुष्परिणाम असा झाला की, येथील मुसलमान लोक ‘पाकिस्तान’च्या मागणीचे समर्थन करू लागले; परंतु जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली, तेव्हा येथील अत्यल्प मुसलमान पाकिस्तानात गेले; पण आता तर असे वाटते की, या लोकांनी मेवातलाच ‘पाकिस्तान’ बनवण्याचा चंग बांधला आहे. १४ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मेवातच्या सर्व ५०८ गावांमध्ये नावालाही हिंदू शेष न रहाणे, हिंदूंचा छळ, हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आणि हिंदूंनी मेवातमधून पलायन करावे, यासाठी हिंदु व्यापार्‍यांवर बहिष्कार टाकणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

मेवातचा नकाशा

या पूर्वीचा भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा:  https://sanatanprabhat.org/marathi/783925.html

६. मंदिराची भूमी आणि स्मशान भूमी यांवर ताबा घेणे

मेवातच्या ग्रामीण भागातून हिंदूंच्या पलायनानंतर मंदिराची भूमी आणि स्मशान भूमी यांवर मुसलमानांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे जे काही हिंदू अजूनही ग्रामीण भागात शिल्लक राहिले आहेत, त्यांची फारच अडचण होत आहे. एखाद्या हिंदूला आपल्या एखाद्या मृत नातेवाईकावर अंत्यसंस्कार करायचे झाल्यास त्याला ते एखाद्या रस्त्याच्या कडेला करावे लागतात. अशाच एका प्रसंगात प्रेम नावाच्या युवकाने सांगितले की,  स्मशानाच्या भूमीवर आसपासच्या मुसलमान शेतकर्‍यांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे आम्हा लोकांची फार मोठी अडचण होत आहे. ज्या लोकांनी ती भूमी कह्यात घेतली आहे, त्यांना सांगायला गेले, तर ते म्हणतात, ‘शवच जाळायचे आहे, तर ते कुठेही जाळून टाका.’ प्रेमने हेही सांगितले की, आता अटेरना शमशाबाद गावामध्ये हिंदूंची केवळ तीनच घरे शिल्लक राहिली आहेत.

७. गोवंशियांची सर्रास हत्या

स्थानिक लोकांनी सांगितले की, संपूर्ण मेवातमध्ये सूर्योदयापूर्वीच अनेक गोवंशांची हत्या केली जाते. नंतर ते मांस एक किलो, अर्धा किलो असे पिशवीत बंद करून विकले जाते. मांस विकण्यासाठी हे लोक गावोगावी फिरत असतात. त्यांची संख्या दूध विकणार्‍यांपेक्षा अधिक असते. येथे गोतस्करी करून गोवंश आणले जातात. मेवातमधील भाजपचे माजी अध्यक्ष आणि गो-संरक्षण करणारे श्री. भानीराम मंगला यांनी सांगितले, ‘गोहत्या करणार्‍यांना मेवातच्या स्थानिक नेत्यांचे संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. मतपेटीच्या राजकारणाने मेवातची सभ्यता आणि संस्कृती यांच्यामध्ये संपूर्ण पालट करून ठेवला आहे.’

८. मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत भरमसाठ वाढ

संपूर्ण मेवातमध्ये मोठ्या संख्येत मशिदी आणि मदरसे यांची निर्मिती होत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला प्रत्येक वळणावर मशिदी बांधल्या जात आहेत आणि ८-१० गावांमध्ये एक मोठा मदरसा बनवला जात आहे. कुणीही गुन्हा केला की, तो गुन्हेगार रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या मशिदीत लपून बसतो. जो गुन्हेगार मशिदीत लपून बसतो, तो पोलिसांच्या तावडीत येऊ शकत नाही; कारण पोलीस मशिदीमध्ये अन्वेषण करण्यापासून दूर रहातात. एखाद्या वेळी पोलिसांनी असे केले, तर पोलिसांवर धर्मग्रंथाचा अवमान केल्याचा आरोप लावून पुष्कळ दंगा केला जातो.

९. मेवात भागात विदेशी मुसलमानांना वसवले जाणे

मेवातचे होत आहे इस्लामीकरण

मेवातच्या काही भागांत बांगलादेशी घुसखोर आणि म्यानमारहून पळवून लावण्यात आलेले रोहिंग्या यांना वसवले जात आहे. त्यांना वसवण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमी उपलब्ध केली जाते. कॅनाल रेस्ट हाऊस (हे एका स्थानाचे नाव आहे) आणि पुन्हाना या भागांमध्ये तंबू लावून त्यामध्ये या घुसखोरांना ठेवले जाते. त्यानंतर इतर पंचायतीमध्ये त्यांना वसवले जाते. काही जणांचे म्हणणे आहे की, या मुसलमानांना ‘जमियत उलेमा हिंद’ आणि या व्यतिरिक्त मेवातच्या धार्मिक संघटना, पंचायत प्रतिनिधी अन् विविध राजकीय पक्षांचे मुसलमान नेते साहाय्य करत आहेत. स्थानिक लोकांनी सांगितले की, जवळजवळ २०० विदेशी मुसलमान परिवारांना नूंहच्या रेवसन आणि फिरोजपूर झिरका या भागांमध्ये वसवण्यात आले आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार या मुसलमानांच्या साहाय्यासाठी स्थानिक मुसलमानांकडून पैसे वसूल केले जातात.

१०. मुसलमानांमध्ये कट्टरतावाद निर्माण करणारी तबलिगी जमात

मेवातमधील मुसलमानांमध्ये कट्टरतावाद निर्माण करण्याचे काम तबलिगी जमात करत आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, या जमातीचे लोक गावोगावी फिरत असतात आणि मुसलमान युवकांना ‘जिहाद’ अन् ‘लव्ह जिहाद’ करण्यासाठी उद्युक्त् करतात, तसेच हिंदूंना मुसलमान बनवण्याचे कार्य करतात. पिन्गवां येथील एक युवक ललित याने सांगितले, ‘साधारणतः एक वर्षापूर्वी मौलानांचे भाषण ऐकून मी प्रभावित होऊन मुसलमान झालो होतो आणि इस्लामचा प्रचार करत होतो; परंतु लवकरच मला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली अन् आर्य समाजातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी पुन्हा हिंदु धर्मात आलो.’ अशा प्रकारच्या घटना मेवातमध्ये साधारणतः प्रतिदिनच घडतच असतात. मेवातचे बहुतांश मुसलमान युवक हे ट्रकचालक आहेत. या बहाण्याने त्यांना संपूर्ण भारतात जाण्याची संधी मिळते. प्रतिदिन हे युवक कुठून ना कुठून तरी हिंदु युवतींना आपल्या समवेत घेऊन येतात. काही दिवस तिच्याशी मौज-मस्ती करतात, तिचा उपभोग घेतात आणि नंतर त्या युवतींना आपापसांत विकतात. ‘आर्य वेद प्रचार मंडल, मेवात’चे संरक्षक श्री पदमचंद आर्य यांनी सांगितले की, अशा अनेक युवतींना आमच्या कार्यकर्त्यांनी तळहातावर शिर घेऊन धर्मांधांच्या पंजातून सोडवले आहे.

ही आहे भारताच्या इस्लामीकरणाची एक झलक ?

मेवातमधून हिंदूंना पळवून लावले जात आहे. दुसर्‍या बाजूला म्यानमारमधून पळवून लावलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना तेथे वसवण्यात येत आहे. अशांना मेवातमध्ये वसवण्यासाठी मुसलमानांच्या कितीतरी धार्मिक संघटना साहाय्य करत आहेत.

गावातील मंदिरांची भूमी आणि स्मशान भूमी यांवर स्थानिक मुसलमानांनी ताबा मिळवला आहे. हिंदूंना होणारा त्रास हा धर्मनिरपेक्ष प्रसारमाध्यमांसाठी बातमी होऊ शकत नाही.

त्यामुळे मेवातमधील हिंदूंना होत असलेला त्रास कुणाला समजू दिला जात नाही आणि आणखी ज्या गोष्टी घडत आहेत, त्याही त्रासदायकच आहेत. त्यामुळे याला ‘ही आहे भारताच्या इस्लामीकरणाची एक झलक !’, असेच म्हणावेसे वाटते.

– श्री. अरुण कुमार सिंह, देहली.

११. इस्लामी शैलीमध्ये सरकारी भवनाचे बांधकाम करणे

मेवातमध्ये ज्या काही सरकारी इमारती बनवल्या जात आहेत, त्या बांधकामामध्ये इस्लामी शैलीची छाप स्पष्ट रूपाने दिसून येते. उदाहरणार्थ नूंहमधील ‘मंत्रालय’ आणि नूंहच्या जवळच असलेल्या नल्लड गावातील ‘चिकित्सा महाविद्यालय’ यांमध्ये ही छाप दिसून येईल. या इमारतीमध्ये मशिदीसारखे मीनार आणि घुमट बनवण्यात आले आहेत. हिंदूबहुल क्षेत्रात कोणतीही सरकारी इमारत मंदिराच्या शैलीत बांधली जाऊ शकते का ? जर नसेल, तर मेवातध्ये इस्लामी शैलीत बांधकाम करणे असे का घडत आहे ? मांडीखेडातील ‘अल-आफिया जनरल रुग्णालय’ ज्याची निर्मिती ‘ओमान’ देशाच्या सुलतानने त्याच्या कन्येच्या नावाने बांधले आहे, तेसुद्धा संपूर्णतः इस्लामी शैलीत बांधले आहे. प्रश्न हा आहे की, एका रुग्णालयाच्या इमारतीची निर्मिती इस्लामी शैलीच्या बांधकामात का करण्यात आली आहे ? यासाठी अनुमती कुणी दिली ?

१२. पोलिसांनाच मारहाण

मेवातमध्ये पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण होण्याची घटना ही काही नवीन नाही. जेव्हा केव्हाही पोलीस एखादा गुन्हेगार, तस्कर, बलात्कारी किंवा हत्या करणार्‍याची धरपकड करण्यासाठी जातात, तेव्हा स्थानिक लोक पोलीस कर्मचार्‍यांना घेरून मारहाण करतात. देहलीमध्येही मेवातचे युवक दरोडेखोर, हत्या करणे, मौल्यवान वस्तू हिसकावून पळून जाणे, बलात्कार इत्यादी घटनांमध्ये सामील असल्याचे आढळते. देहलीमध्ये त्यांना ‘मेवाती टोळी’ या नावाने ओळखले जाते. जेव्हा कधी देहली पोलीस मेवाती टोळीतील एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी मेवातमध्ये जातात, तर त्यांनाही तेथे मारहाण केली जाते.

– श्री. अरुण कुमार सिंह, देहली.

(साभार : ‘हिंदु रायटर्स फोरम’, नवी देहली)