![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/06/03173556/bhonge.jpg)
‘शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भातील कुडाळ पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी १२ डिसेंबर २०२४ या दिवशी अनधिकृत भोंग्यांविषयी सर्व धर्मियांची बैठक घेतली. या वेळी त्यांनी ‘सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्यशासनाने काढलेल्या आदेशाचे पालन केले नाही, तर अनधिकृत भोंगे लावणार्यांवर गुन्हा नोंद केला जाईल, तसेच आवाजाची मर्यादा ओलांडणार्यांवर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली.’ (१३.१२.२०२४)