निरोगी जीवनासाठी व्यायाम – ३६
आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांमधील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन, ‘अर्गोनॉमिक्स’चे नियम आणि आजारानुसार योग्य व्यायाम’ यांची माहिती देणार आहोत. व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल ! पचन सुधारण्याच्या दृष्टीने व्यायामाच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/863043.html


१. पचनसंस्था चांगली होण्यासाठी लाभदायी व्यायाम
१ अ. ‘ऍरोबिक’ व्यायाम (टीप) : ‘चालणे, धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे’, यांसारखे व्यायाम हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि पोटाची हालचाल नियमित करतात. या प्रकारच्या व्यायामाने पित्तामुळे होणारी जळजळ नियंत्रित करणार्या ‘फिकॅलिबॅक्टेरियम प्रास्नित्झी’ आणि ‘अॅकरमान्सिया म्युसिनीफिला’ (‘Faecalibacterium prausnitzii’ आणि ‘Akkermansia muciniphila’) यांसारख्या चांगल्या जिवाणूंची संख्या वाढते.
टीप : या व्यायामांमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) वापरला जातो. ‘ऍरोबिक’ या व्यायामात मनुष्याचे हृदय आणि फुप्फुसे अधिक प्रमाणात कार्य करतात.
१ आ. योग आणि ‘स्ट्रेचिंग’ : शरिराला ‘टि्वस्ट’ करणारी आणि पुढे झुकवणारी योगासने पचनसंस्थेवर परिणाम करतात. ती वाताचा त्रास न्यून करून बद्धकोष्ठता दूर करतात. योग केल्याने तणाव न्यून होऊन पचनावर चांगला प्रभाव पडतो.
१ इ. ‘हाय-इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT)’ : या प्रकारात ‘थोडा वेळ जोरदार व्यायाम आणि त्यानंतर आराम’, अशी पद्धत असते. हे प्रकार पोटातील जीवाणूंची विविधता वाढवतात आणि चयापचयाची प्रक्रिया अधिक चांगली करतात.
१ ई. ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग (वजन उचलणे)’ : हा प्रकार माफक स्वरूपाचे वजन उचलण्याप्रमाणे असतो. ‘ऍरोबिक’ व्यायामाच्या समवेत हा प्रकार केल्यावर शरिरावरील सूज (इन्फ्लमेशन) न्यून होते आणि पोटाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (८.१२.२०२४)
निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/865199.html
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !