अमेरिकेची निर्मितीच मुळात कायद्याच्या उल्लंघनातून आणि रक्तपातातून झाली. प्रारंभीला अमेरिकेतील मूळ निवासी ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली करण्यात आल्या, त्यांच्या भूमी बळकावण्यात आल्या. तेव्हापासून तर केवळ संशयाच्या आधारावर संयुक्त राष्ट्रांचे आदेश धुडकावत इराकमध्ये आणि नंतर अफगाणिस्तानात लष्करी हस्तक्षेप करत शेकडो निष्पाप लोकांच्या कत्तली अमेरिकेने केल्या. आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे निर्देश यांपेक्षा केवळ स्वतःच्या हितसंबंधांना अमेरिकेने नेहमीच प्राधान्य दिले. अशी अमेरिका भारताला ‘कायद्याच्या योग्य प्रक्रिये’चा (Due Process of Law) अवलंब करायला सांगतो, हे हास्यास्पद आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे.