आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर लागू होणार समान नागरी कायदा !

मुसलमानांनी दुसरे लग्न केले, तर कारागृहात टाकणार असल्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे सुतोवाच !

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायदा लागू होणार आणि त्यामुळे मुसलमानांना दुसरे लग्न करता येणार नाही, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांना उद्देशून बोलतांना मुख्यमंत्री सरमा यांनी ही माहिती दिली.

सौजन्य Oneindia Hindi

१. बदरुद्दीन अजमल यांनी यापूर्वी म्हटले होते की, भाजप मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. जर मुसलमानांना पुनर्विवाह करायचा असेल, तर त्यांना कुणीही रोखू शकत नाही; कारण त्यांचा धर्म त्यांना तसे करण्यास अनुमती देतो.

२. आसाममधील उदालगिरी येथे बोलतांना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, जर अजमल यांना पुन्हा लग्न करायचे असेल, तर अजूनही संधी आहे; कारण निवडणुकीनंतर समान नागरी कायदा राज्यात लागू होईल. मग तुम्ही दुसरे किंवा तिसरे लग्न केले, तर कारागृहात जाल.