China vs Philippines : आम्ही आमच्या शत्रूंच्या विरोधात कारवाई करू ! – फिलिपाईन्स

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर फिलिपाईन्सने नाव न घेता चीनला दिली धमकी

फिलिपाईन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस

बीजिंग (चीन) – आम्हाला कुठल्याही देशासमवेत वाद नको आहे. विशेषकरून आमचे मित्र असल्याचा दावा करणार्‍या देशांसमवेत आम्हाला संघर्ष करायचा नाही; पण आम्ही गप्प बसणार नाही. फिलीपीनी झुकणार नाहीत. आम्ही आमच्या शत्रूंच्या विरोधात कारवाई करू, अशा शब्दांत फिलिपाईन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस यांनी चीनचे नाव घेता म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून हे विधान केले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नुकताच फिलिपाईन्सचा दौरा केला होता. ‘दक्षिण चीन सागरी वादात आम्ही तुमच्यासमवेत आहोत’, असे त्यांनी सांगितले होते. यानंतर मार्कोस यांनी वरील विधान केल्याने ‘यामागे भारत आहे का ?’, अशी चर्चा होत आहे.

१. दक्षिण चीन सागराच्या सीमेवरून अनेक दशकांपासून फिलिपाईन्स आणि चीन यांच्यामध्ये वाद आहे. दक्षिण चीनच्या सागरात फिलिपाईन्सची नौका आणि चिनी तट रक्षक दल यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शाब्दिक युद्ध चालू आहे.

२. फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई या नैसर्गिक साधन संपत्तीने समुद्ध असलेल्या देशांच्या बाजूने जाणार्‍या व्यस्त जलमार्गावर चीन नेहमीच त्याचा दावा सांगत आला आहे.