सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिला गुरुकृपेने सुचलेली कविता !

‘फाल्गुन पौर्णिमेला (होळी पौर्णिमा), म्हणजे २५.३.२०२४ या दिवशी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी काव्यसुमने येथे देत आहोत.

सद्गुरू स्वाती खाड्ये

सद्गुरु ताई म्हणजे आनंदाचे कारंजे ।
सद्गुरु ताई म्हणजे चैतन्याचा धबधबा ।
सद्गुरु ताई म्हणजे खळखळत्या हास्याचा निर्मळ झरा ।। १ ।।

कु. प्रार्थना महेश पाठक

सद्गुरु ताई म्हणजे क्षात्रतेजाची तळपती तलवार ।
सद्गुरु ताई म्हणजे हिंदुत्वाची धगधगती मशाल ।
सद्गुरु ताई म्हणजे हिंदु राष्ट्राचा हुंकार ।। २ ।।

सद्गुरु ताई म्हणजे उत्कट गुरुभक्ती ।
सद्गुरु ताई म्हणजे निर्मळ प्रीती ।
सद्गुरु ताई म्हणजे गुरुचरणांवरील दृढ श्रद्धा ।। ३ ।।

सद्गुरु ताई माझी आध्यात्मिक आई ।
त्यांच्या चरणी लीन मी छोटी खारुताई ।
गुरुदेवा, कळेना या छोट्या जिवाला ।
कशी होऊ या ऋणांतून उतराई ।। ४ ।।

गुरुदेवांचे आनंदी फूल,

– कु. प्रार्थना महेश पाठक,  पुणे. (१३.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक