भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ४)

‘इंग्रजांनी रेल्वे दिली, मोगलांनी वास्तूकला आणि ग्रीकांनी विज्ञान शिकवले’, हे शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना भारताचा खरा इतिहास शिकवायला हवा !

स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७५ वर्षांचा वस्तुनिष्ठ इतिहास ‘हिंदु’ जगासमोर अभावानेच कुणी मांडला असेल. हा इतिहास हिंदु समाजाला लक्षात आला असता, तर त्याच्यावर होत असलेला अन्याय नि अत्याचार यांविरोधात तो संघटितपणे उभा राहिला असता; परंतु आपल्या संपूर्ण व्यवस्थेने ते कधीच त्याला ठाऊक होऊ दिले नाही. यामागे केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय षड्यंत्र कार्यरत राहिले आहे. हे लक्षात आणून देणारा ‘प्राच्यम् स्टुडिओज’ने प्रसारित केलेल्या व्हिडिओतून अत्यंत सुरेखपणे सांगण्यात आले आहे. ‘प्राच्यम् स्टुडिओज’चे प्रमुख कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी यांच्या सौजन्याने या व्हिडिओची संहिता आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.

याचा तिसरा भाग आपण १७ मार्च या दिवशीच्या अंकात वाचला. त्यामध्ये ‘भारताचा तिसरा वसाहतवाद, इस्लामी आक्रमणकर्ते भारतीय इतिहासाचा केंद्रबिंदू बनले कसे ?, ‘जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचा’चा उदय आणि इंदिरा गांधी यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द राज्यघटनेत घुसडले’, आदी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा पुढचा भाग पाहूया.

(हा व्हिडिओ जगातील पहिले हिंदु ओटीटी असलेल्या ‘प्राच्यम्’वर विनामूल्य पहाता येऊ शकते. भ्रमणभाषवरून prachyam.com वरून हा व्हिडिओ हिंदू पाहू शकतात. या व्हिडिओचे नाव आहे – ‘साहेब’ जे कधी गेलेच नाहीत : भाग २ – परिणाम.’ भाग-१ मधून स्वातंत्र्याच्या आधी १००० वर्षांचा हिंदुद्वेषी इतिहास दाखवण्यात आला आहे. त्याचा लेख एप्रिल २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.)(भाग ४)

 मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :https://sanatanprabhat.org/marathi/774582.html

२०. ‘परमिट राज’मुळे भ्रष्टाचाराचारात वाढ !

कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त)

 

प्रसिद्ध रंगमंच सिद्धांतकार आणि संगीततज्ञ प्रा. भरत गुप्त सांगतात, ‘‘मी नेहमी म्हणतो की, दोन गोष्टींनी भारताचा नाश केला आहे – समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ! आपण ‘परमिट राज’मध्ये (परवाना मागण्याच्या व्यवस्थेमध्ये) रहात होतो. मला आठवते की, मी लहान असतांना आईसाठी एक सुई विकत घ्यायला गेलो होतो, तेव्हा ती ‘यार्डली’ आस्थापनाची होती, जी इंग्लंडमध्ये बनवण्यात आली होती. समाजवादाच्या तत्त्वांनुसार अगदी सोप्या प्रकारचे तंत्रज्ञान आयात करण्यासाठीसुद्धा परवाना घ्यावा लागत असे किंवा जर आपण काही वस्तू आयात केल्या असतील, तर त्यासाठीही परवाना घ्यावा लागायचा. त्यांना विकण्यासाठीही परवाना घ्यावा लागायचा. येथूनच भारतात भ्रष्टाचार चालू झाला; कारण परवाना मिळवण्यासाठी तुम्ही नोकरशाही आणि राजकारणी यांना लाच देता. या सर्वांतूनच सरकार आणि राजकीय पक्ष यांना कळाले, ‘संपत्ती जमा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे !’ देशात काळा पैसा मुबलक प्रमाणात वाढला. ते राजकीयदृष्ट्या सोयीचे होते आणि आजपर्यंत भारतीय राजकारण काळ्या पैशाच्या पायावर टिकून आहे !’’ वर्ष १९७८ मध्ये देहली विद्यापिठाचे अर्थतज्ञ राज कृष्ण यांनी याला नाव दिले, ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ ! ‘सोशलिस्ट रेट’ किंवा ‘नेहरुवियन रेट’ नव्हे, तर ‘हिंदू रेट’ ! (यातून समाजवादामुळे भारताची अर्थव्यवस्था मंद गतीने वाढत असतांनाही हिंदूंना न्यून लेखण्यासाठी अशा प्रकारच्या संज्ञेचा कुत्सितपणे वापर केला जात असे.)

२१. नेहरूंकडून भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष आणि पाश्चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण !

नेहरूंच्या धोरणांनी त्या खर्‍या भारतीयत्वाचा विसर पाडला, ज्याच्यासाठी मुळात संपूर्ण स्वातंत्र्यलढा लढला गेला होता. नेहरूंच्या केंब्रिज विद्यापिठाच्या प्राध्यापिका अइसे जारकोल हिने या सवयीला ‘स्वयं-प्राच्यवाद’ (ऑटो ओरिएन्टलिझ्म्) म्हटले आहे.

प्रा. अइसे जारकोल सांगतात, ‘‘जर भारतात काहीतरी चुकीचे घडले, तर लोक म्हणतात, ‘जर हे पश्चिमेकडे झाले असते तर ? जर तिथे पाऊस पडला असता, तर असा पूर नसता आला !’ थोडक्यात नेहमीच काल्पनिक तुलना केली जाऊ लागली. शाळेत गेल्याने मुलांना अप्रत्यक्षपणे शिकवण देण्यात आली की, ही समाजाची ‘आदर्श’ मानके आहेत, या अपेक्षा आहेत. दुसरीकडे हे माझे आई-वडील आहेत आणि ते मागे राहिले आहेत. युवा पिढी स्वतःकडे पाश्चात्त्यांच्या दृष्टीकोनातून पाहू लागली. गंमत अशी की, कोणत्याच पाश्चात्त्याला वाटत नाही की, ‘तुम्ही कमकुवत आहात !’

नेहरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालतांना इंग्रजीची पूजा होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब यांहून मोठी ओळख इंग्रजी बनली. जर यशस्वी व्हायचे असेल, तर ‘साहेब’ बनावे लागेल. ही लाट साहेबांमध्ये श्रेष्ठगंड म्हणून स्थिरावली आणि सामान्य लोकांमध्ये हीन भावना म्हणून ! शाळा आम्हाला शिकवू लागल्या की, इंग्रजांनी आपल्याला रेल्वे दिली, मोगलांनी वास्तूकला आणि ग्रीक लोकांनी विज्ञान ! ‘समृद्धी आणि आधुनिकता, म्हणजे विदेशींची नक्कल करणे’, असे मध्यमवर्गीयांचे मत झाले. प्रगतीसाठी संस्कृतीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. काल जे आम्हाला फटके मारत होते, आज आम्हाला स्वतःलाच त्यांच्यासारखे बनावेसे वाटू लागले. (केवढा हा दैवदुर्विलास ! – संपादक)

जपानमध्ये आजही तेथील मूळ ‘शिन्तो संस्कृती’ ‘कटिंग एज रोबोटिक्स’ (अत्याधुनिक रोबोटचे तंत्रज्ञान) आणि कारनिर्मिती यांच्यासमवेत पुढे जात आहे; परंतु नेहरूंच्या आधुनिक भारताने फार पूर्वीच तिच्या प्राचीन संस्कृतीशी तडजोड केली होती.

२२. इंग्रजीला अनन्यसाधारण महत्त्व दिल्याने भारताची झालेली अवनती !

प्रसिद्ध लेखक आणि प्रा. नीरज अत्री सांगतात, ‘‘जपानी त्यांच्या मातृभाषेत विचार करतात आणि काम करतात, म्हणून त्यात ते ‘ब्रेकथ्रू’ (अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण संशोधन) करू शकतात. याउलट आपल्या मेंदूची जी प्रक्रिया करण्याची क्षमता आहे, ती केवळ इंग्रजीला ‘डीकोड’ (समजून घेण्यात) करण्यातच वाया जाते. आपल्याकडे कोणत्याही सामान्य व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो ? आपल्याकडे कायद्यानुसार औषधावरील ‘लेबल’ इंग्रजीत असते. न्यायालयीन कार्यवाहीतही अधिकाधिक इंग्रजीतच तर बोलले जाते !

प्रा. अत्री पुढे सांगतात, ‘‘तिसरी गोष्ट ज्याला आपण स्वतःवर ओढावून घेतले, ती म्हणजे ‘शिक्षणव्यवस्था’ ! यासंदर्भात श्री. उदय माहूरकर सांगतात, ‘‘याचेही काँग्रेसशीच देणे-घेणे आहे. प्रत्येक युरोपीय देशात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम स्थानिक भाषेतच आहेत. आपल्याकडे इंग्रजीखेरीज दुसर्‍या भाषेत काही नव्हते, आता ते येत आहे !’’ प्रा. अत्री सांगतात, ‘‘ही सामान्य माणसाशी किती मोठी हिंसा आहे, हे आपण पाहू शकतो. त्यात काय लिहिले आहे, हे त्याला वाचताच येत नाही !’’

श्री. माहूरकर यांच्या मते ‘भारताकडे संपूर्ण जगाहून अधिक कुशल शक्ती आहे; पण लोक यात अपयशी ठरले. परिस्थिती अशी झाली की, लोक केवळ कला शाखेची पदवी (बी.ए.) आणि पदव्युत्तर (एम्.ए.) शिक्षण घेत राहिले. कुणी सुतार असेल, तर तो उत्कृष्ट सुतारकाम करून भरपूर पैसा कमावू शकतो. त्याचे कुटुंब ५०० वर्षांपासून सुतारकामात आहे आणि त्यालाही वाटू लागले की, त्याने ‘एम्.ए.’, ‘बी.ए.’ करावे.

२३. वर्ष १९९१ च्या आर्थिक क्रांतीपासून भारताच्या नव्या दुर्दैवी अध्यायाला प्रारंभ !

वर्ष १९९० येता-येता बर्लिनची भिंत कोसळली आणि शेवटी सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. या विघटनानंतर भारताच्या मार्क्सवाद्यांना अनाथ झाल्यासारखे झाले. स्वतंत्र भारताचे बालपण एका निरुपयोगी (फालतू) विचारसरणीच्या मागे लागून नष्ट झाले होते. वर्ष १९८९ ते १९९१ या कालखंडात भारतात ३ सरकारे पालटली आणि अर्थव्यवस्था कोलमडली. वर्ष १९९१ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, विदेशी मुद्रांकोषात केवळ २ आठवडे टिकतील, एवढेच आयात करण्याचे पैसे शिल्लक होते. नरसिंहाराव पंतप्रधान आणि मनमोहन सिंह अर्थमंत्री झाले. तेव्हा भारताने इंग्लंडला ४७ टन सोने विकले, जागतिक बँकेकडून कर्ज घेतले आणि त्याच्या बदल्यात मनमोहन सिंह, जे संयुक्त राष्ट्रांचे माजी कर्मचारी होते, त्यांनी रातोरात पश्चिमेला भारतीय अर्थव्यवस्थेत प्रवेश करण्यास अनुमती दिली. मनमोहन सिंह यांचे जवळचे मित्र अमर्त्य सेन यांनी युरोपातील कुख्यात बँकिंग कुटुंब रॉथचाइल्डशी संबंध निर्माण करून त्या कुटुंबात लग्न केले. रॉथचाइल्ड हे असे कुटुंब आहे, जे सर्व युरोपीय देशांना कर्ज देत होते. हा निव्वळ योगायोग होता का ? साम्राज्ये संपतात; पण त्यांना निधी पुरवणारे नाही ! भारतासाठी वर्ष १९९१ चे आर्थिक अवमूल्यन हा असाच एक टप्पा होता, जेथून भारताच्या दुर्दैवाचा ‘नव वसाहतवाद’ एक नवीन अध्याय चालू झाला !

२४. आर्थिक क्रांतीसमवेत भारतीय संस्कृतीचा र्‍हास !

९० च्या दशकात भारतीय मध्यमवर्गीय घरांमध्ये अमेरिकी आणि युरोपीय संस्कृतीचा पूर आला. रुपर्ट मर्डोकच्या ‘न्यूज कॉर्पोरेशन’ने (‘स्टार नेटवर्क’चे मालक) भारतातील शहरी मुलांच्या मन-बुद्धी यांवर चित्रपटांद्वारे युरोप आणि अमेरिका येथील चमकणारी शहरे, ‘स्टायलिश’ अमेरिकी नौदल अन् ‘सीआयए’ एजंटची चित्रे (अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचार्‍यांची चित्रे) यांचा मारा करून कायमचा संस्कार करून टाकला. उपग्रहाद्वारे पाश्चात्त्य संस्कृती थेट आपल्या खासगी खोलीत पोचली. (‘एच्.बी.ओ. मूव्हीज’सारख्या वाहिन्यांवरून अश्लील पाश्चात्त्य संस्कृतीचा भडीमार भारतीय तरुण मनावर होऊ लागला.) सोव्हिएत संघाचा व्यावसायिक प्रचार (प्रॉपगेंडा) करणारे युरी बेझमेनोव्ह सांगतात, ‘ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, जी काही वेळा सर्वसाधारण व्यक्तीच्या लक्षात येत नाही. ही घड्याळातील लहान काट्याच्या गतीसारखी आहे. तो चालत असतो; पण जरी तुम्ही त्याकडे बारकाईने पाहिले, तरी तुम्हाला कोणतीही हालचाल दिसत नाही.’

२५. पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे लागून भारतीय समाजाची झालेली भयावह अधोगती !

आपला अर्धा दिवस साम्यवादी विचारसरणीचा अभ्यासक्रम समजून घेण्यात जायचा आणि उर्वरित अमेरिकी समाजावर मंत्रमुग्ध होण्यात (उदा. कार्टून नेटवर्क, पोगो यांसारख्या वाहिन्या पहाण्यात) ! महाविद्यालये अचानक अय्याशीचे (मौजमजेचे) अड्डे बनले आणि तरुणपण टवाळखोरीसाठीचा लायसन्स (अनुज्ञप्ती) ! अशा प्रकारे जन्म झाला आजच्या नवीन ‘इंडियन लिबरल’चा (तरुण उदारमतवाद्यांचा) – पश्चिमेच्या महानतेने मंत्रमुग्ध, त्यांच्या राहणी-विचारसरणी यांनी प्रभावित; परंतु त्यामागील वास्तविक सत्याविषयी मात्र अनभिज्ञ !

लेखक आणि संशोधक डॉ. ओमेंद्र रत्नू सांगतात, ‘‘ते तुमच्या चेतनेला अशा प्रकारे फसवतात, तुम्हाला स्वस्त भावनिकतेत अशा प्रकारे अडकवून ठेवतात की, त्यामुळे आपली संपूर्ण संस्कृती आणि समाज यांची जी चेतना आहे, ती अत्यंत खालच्या पातळीला पोचली. आपण ना पुस्तके वाचत, ना वादविवाद करत, ना आपल्या समाजासमोर कोणते वैचारिक आव्हान होते. आपण प्रेमही पडद्यावर जाऊन पहात. आपला द्वेषही खराखुरा राहिला नाही. आपल्या संपूर्ण समाजाचे एक छद्म व्यक्तीमत्त्व (स्युडो-पर्सनॅलिटी) बनले.

२६. वैचारिक वसाहतवादाचे दलाल !

आंतरराष्ट्रीय व्यवहारतज्ञ श्री. रुचिर शर्मा सांगतात, ‘‘हेच नववसाहतवादाचे (‘निओ-कोलोनिअलिझम्’चे) सार आहे. आर्थिक पारतंत्र्य कायम आहे आणि आपण अद्यापही पाश्चात्त्यांसाठी ‘कच्चा माल अन् स्वस्त कामगार यांचे स्त्रोत आहोत’, तसेच अजूनही त्यांच्या उत्पादनांची बाजारपेठ आहोत. त्यांचे शैक्षणिक आणि राजकीय सिद्धांत यांच्या प्रयोगांची प्रयोगशाळा आहोत. भेद एकच की, तांत्रिकदृष्ट्या आपण परकीय राजवटीत नाही आहोत. ते भारतीय जनता आणि देश यांची मानहानी करण्यासाठी त्यांच्या तथाकथित सर्वोत्तम मूल्यांचा वापर करतात. अशा वेळी आपल्याकडे दोनच पर्याय रहातात – या सांस्कृतिक आक्रमणांपासून स्वत:चा एकतर बचाव करणे अथवा पाश्चात्त्यांसारखे शिकून त्यांच्याकडूनच अशी मान्यता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की, ‘हो आता तुम्हीही उदारमतवादी आहात, हे तुमचे प्रमाणपत्र आहे, हे तुमचे बिस्किट (पुरस्कार) आहे ! ‘गुड डॉग (चांगला आज्ञाधारी कुत्रा) !’ अशा लोकांना (उदा. अरुंधती रॉय, राणा अयुब आदींना) भारतात ‘व्याख्याता’ ही पदवी देण्यात आली. यांसारख्यांना ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटीश राज ‘मुन्शी’ म्हणत असत. तुम्ही स्थानिक कारकून किंवा दुभाषी नियुक्त कराल, जो तुम्हाला गोष्टी समजावून सांगेल आणि नंतर तुम्ही जे सांगाल, ते तो लिहून देईल आणि नंतर तुमच्या वतीने स्थानिकांशी बोलेल. यामध्ये एक वकिलाचीही नियुक्ती केली जायची – याचा अर्थ अधिवक्ता नव्हता, तर तो ‘दलाल’ होता.

(साभार : ‘प्राच्यम्’ हिंदु ओटीटी)