सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देहली, फरिदाबाद (हरियाणा), नोएडा आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

मथुरा येथील ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा प्रतिसाद

फरिदाबाद (हरियाणा) – सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देहली येथील सनातन धर्म  मंदिर ग्रेटर कैलास भाग-२, फरिदाबाद (हरियाणा) सेक्टर २८ येथील शिवशक्ती मंदिर आणि ‘एन्आयआयटी’ ५, नोएडा येथील लक्ष्मीनारायण मंदिर सेक्टर ५६, तसेच मथुरा येथील श्री भूतेश्वर महादेव मंदिर, श्री रंगेश्वर महादेव मंदिर, होली गेट आणि श्री गर्तेश्वर महादेव मंदिर, जन्मभूमी रोड अशा विविध ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

१. फरिदाबाद (हरियाणा) सेक्टर २८ येथील  शिवशक्ती मंदिरातील ग्रंथ प्रदर्शनावर  देहली विश्वविद्यालयाच्या दयाल सिंह महाविद्यालयाचे प्राध्यापक वीरेंद्र सिंह यांनी भेट दिली. ते हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे  वर्गणीदार झाले. या वेळी ते म्हणाले, ‘‘सनातन धर्माशी संबंधित प्रत्येक प्रकारचे साहाय्य करण्यासाठी मी नेहमीच सिद्ध आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची आवश्यकता लागल्यास सांगू शकता.’’

नोएडा येथील ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

२. फरिदाबाद (हरियाणा) सेक्टर २८ येथील शिवशक्ती मंदिरातील ग्रंथप्रदर्शनावर कॅनडामधील एक भारतीय जिज्ञासू आले होते. त्यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली. ते म्हणाले, ‘‘ही उत्पादने दर्जेदार असूनही बाजारमूल्याहून पुष्कळ स्वस्त आहेत.’’

३. एका साधकाची तळमळ पाहून एक जिज्ञासू म्हणाले, ‘‘एम्.बी.ए.’झालेल्या लोकांहून अधिक गुण आणि क्षमता सनातनच्या युवा साधकांमध्ये आहे.’

४. ‘अँटीरोमिओ स्क्वाड’चे (रोमिओविरोधी पथकाचे) उपनिरीक्षक ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ पाहून म्हणाले, ‘‘याविषयी आम्ही हिंदु मुलींना समजवण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो; पण त्यांना समजत नाही.’’

५. एक जिज्ञासू म्हणाले, ‘‘सनातन संस्था हिंदु राष्ट्रासाठी चांगले कार्य करते; म्हणून मला या संस्थेविषयी पुष्कळ आदर वाटतो.’’