दुर्ग (छत्तीसगड) – येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर ख्रिस्त्यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांकडून पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्यात आला. ही घटना ३ मार्च या दिवशी घडली.
१.बजरंग दलाने म्हटले की, येथे अनेक दिवसांपासून धर्मांतराच्या तक्रारी येत होत्या. ओरिया कॉलनीत प्रार्थना सभेच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न केला जात आहे.
२. रायपूर नाक्याजवळील एका चर्चमध्ये प्रार्थनेसाठी शेकडो लोक उपस्थित होते. त्या वेळी बजरंग दलाचे सदस्य येथे पोचले आणि त्यांनी विरोध चालू केला. या वेळी धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांकडून बजरंग दलाच्या लोकांवर आक्रमण, तसेच दगडफेक करण्यात आली. या वेळी झालेल्या हिंसाचारात दोन्ही बाजूचे लोक घायाळ झाले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
३. बजरंग दलाचे सहसंयोजक रामलोचन तिवारी यांनी ख्रिस्ती मिशनरी हिंदूंच्या वस्त्यांमध्ये पत्रके वाटून पैसे आणि शिक्षण याचे आमीष दाखवत आहेत, असा आरोप केला आहे.
४. येथील पाद्री विनोद यांनी एका हिंदु संघटनेशी संबंधित १५ ते २० लोकांनी प्रार्थना करत असलेल्या लोकांवर आक्रमण केल्याचा आरोप केला आहे. या सभेत केवळ ख्रिस्तीच नाही, तर प्रत्येक धर्माचे लोक सहभागी होतात.
५. दुर्गचे पोलीस अधिकारी चिराग जैन यांनी ही घटना गैरसमजातून घडली असून नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
Bajrang Dal activists attacked by Christians in Durg (Chhattisgarh) for opposing conversion of Hindus
With the BJP Government in Chhattisgarh, it is expected that the Government should monitor such incidents through the police and take action accordingly.
Additionally, the… pic.twitter.com/6fru230NRK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2024
संपादकीय भूमिकाछत्तीसगडमध्ये आता भाजपचे सरकार असल्याने सरकारनेच पोलिसांच्या माध्यमातून अशा घटनांवर लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे. तसेच राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करून ख्रिस्ती मिशनर्यांवर लक्ष ठेवले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |