SC Dismisses Asaram Bapu Plea : पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची आजारपणामुळे शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पूज्यपाद संतश्री आसाराम बापू

नवी देहली : पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पू. बापू यांचे वय आणि गुंतागुंतीचे आजार लक्षात घेऊन शिक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने या संदर्भात राजस्थान उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. पू. बापू कथित बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

अधिवक्ता राजेश गुलाब इनामदार यांनी पू. बापू यांच्या वतीने याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यात म्हटले होते की, पू. बापू यांनी ११ वर्षे ७ महिन्यांहून अधिक काळ शिक्षा भोगली आहे. त्यांना हृदयविकार, थायरॉईड, आतडे आणि जठर येथे रक्तस्राव होत आहे.

अशक्तपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, न्यूमोनिया यांसह अनेक आजारांनी ते ग्रस्त आहेत. त्यांच्या हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा अल्प होत आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांचा तुरुंगातच वेदनादायी मृत्यू होण्याची भीती आहे.