Nepal Islamist Attack : बीरगंज (नेपाळ) येथे धर्मांध मुसलमानांचे मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण !

  • श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड

  • आक्रमणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या वेळीही मुसलमानांकडून हिंसाचार

  • पोलिसांच्या उपस्थितीत आक्रमण; मात्र अद्याप कुणावरही कारवाई नाही

बीरगंज (नेपाळ) – नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. येथील ईशानाथजवळील मशिदीसमोर मिरवणूक आल्यावर मुसलमानांनी वाद घातला आणि नंतर दगडफेक करण्यात आली. यामुळे ३ दिवस मूर्ती विसर्जन करण्यात आले नाही. अंततः प्रशासनानेच पुढाकार घेऊन मूर्तीचे विसर्जन केले. १५ फेब्रुवारीच्या घटनेच्या निषेधार्थ हिंदु संघटनांनी बीरगंज बंदची घोषणा केली होती. या वेळीही धर्मांध मुसलमान मोठ्या संख्येने संघटित होऊन रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मिरवणुकीच्या वेळी लावण्यात आलेले खांबांवरील भगवे झेंडे काढून फाडले आणि नाल्यांमध्ये फेकले. तसेच येथे एका मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर आता येथे संचारबंदी लावण्यात आली आहे.

नेपाळमधील ‘हिंदु सम्राट सेना’ या संघटनेचे पदाधिकारी कृष्ण कुमार शहा यांनी माहिती देतांना सांगितले की,

१. श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यासाठी हिंदू शांततेत जात होते. या मिरवणुकीपूर्वी शांतता समितीही स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये हिंदु आणि मुसलमान समाजातील प्रत्येकी ५ सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. दोन्ही बाजूंनी प्रशासनाला आश्‍वासन दिले होते की, ते त्यांच्या समुदायातील लोकांना समजावतील आणि शांतता राखतील; मात्र ही मिरवणूक बीरगंज नगरपालिकेच्या मुसलमानबहुल भागातून जात असतांना रस्त्याच्या कडेला बांधलेल्या मशिदीजवळ थांबवण्यात आली.

२. मुसलमानांनी मिरवणूक मशिदीसमोरून नेण्यास आक्षेप घेतला. यातूनच दोन्ही पक्षांमध्ये वाद चालू झाला. काही वेळातच मशिदीच्या आजूबाजूला असलेल्या मुसलमानांच्या घरांवरून दगड फेकण्यात आले.

३. दगडफेकीत महिला आणि लहान मुले यांचाही सहभाग होता. या दगडफेकीमुळे नरेशकुमार पासवान आणि विसर्जन यात्रेत सहभागी असलेली २ अल्पवयीन हिंदु मुले घायाळ झाली. मिरवणुकीला सुरक्षा देण्यासाठी असलेल्या काही पोलिसांवरही दगडफेक झाली. दगडफेकीमुळे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीचीही मोडतोड झाली.

४. संतप्त भाविकांनी भंगलेल्या मूर्तीसह आंदोलन चालू केले. काही वेळाने प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी हिंदूंना मूर्तीचे विसर्जन करण्याची विनंती केली. या वेळी अधिकार्‍यांनी दंगलखोर मुसलमानांवर कडक कारवाईचे आश्‍वासन दिले.

५. जेव्हा हिंदू मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले, तेव्हा पुन्हा मुसलमानांनी दगडफेक केली.

६. वारंवार होणार्‍या दगडफेकीमुळे हिंदूंमध्येच नव्हे, तर प्रशासकीय अधिकार्‍यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंततः प्रशासनाने हिंदूंच्या उपस्थितीविनाच स्वत:हून मूर्तीचे विसर्जन केले.

७. जवळपास ३ दिवस उलटून गेल्यानंतरही या आक्रमणाच्या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याने हिंदु संघटनांनी १९ फेब्रुवारीला (सोमवार) वीरगंज बंदची घोषणा केली होती.

८. अशी आक्रमणे यापूर्वीही झाली आहेत. श्री दुर्गापूजेसह ७ हून अधिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये जिहाद्यांनी व्यत्यय आणला आहे.

‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देता हिंसाचार

हिंदु सम्राट सेनेचे अध्यक्ष राजेश यादव यांनी सांगितले की, १९ फेब्रुवारीला हिंदु समुदाय शांततेने बंद पाळत असतांना मुसलमान पुन्हा एकदा रस्त्यावर आले. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या आणि इतर हत्यारे होती. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग होता. त्यांनी ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) आणि ‘अल्लाहु अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत रस्त्यावर गोंधळ घातला. या वेळी याच हिंसक जमावाने बीरगंज येथील खांबांवर असलेले भगवान श्रीरामाचे चित्र असलेले भगवे झेंडेही फाडून नाल्यात फेकले.

हिंदु सम्राट सेनेने नेपाळच्या पंतप्रधानांना निवेदन पाठवून हे सुनियोजित षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे आणि ८१ टक्के हिंदु असलेल्या देशातील बहुसंख्य समाजाच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे.

नेपाळमधील महिला पत्रकार किरण जोशी यांनी त्यांच्या ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात पोलीस हिंसक मुसलमानांना नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करतांना दिसत आहेत. मध्येच काळे पठाणी सूट घातलेले काही तरुण पोलिसांपासून दूर पळतांनाही दिसत आहेत.

संपादकीय भूमिका

  • नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि केवळ ५ टक्के मुसलमान असतांना ही स्थिती असेल, तर उद्या हे मुसलमान आणखी २० टक्क्यांनी वाढले, तर नेपाळची स्थिती काश्मीरप्रमाणे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • नेपाळला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र घोषित करून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी तेथील राजकीय पक्ष आणि हिंदु संघटना यांनी प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा पुढच्या पिढीला हिंदु धर्म टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल !