पिंपरी येथील ‘क्रिएटिव्ह अकॅडमी’चे अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले !

‘क्रिएटिव्ह अकॅडमी’चे अनधिकृत बांधकाम महापालिकेने पाडले

पिंपरी (जिल्हा पुणे) – शहरातील रावेत कॉर्नर येथील ‘क्रिएटिव्ह अकॅडमी’चा संचालक नौशाद शेख याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या महिला साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यानंतर या शाळेला मान्यता नाही, तसेच निवासी शाळेच्या आवारात वाढीव बांधकाम केल्याचीही माहिती समोर आली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने १६ फेब्रुवारीला या बांधकामावर बुलडोझर फिरवत कारवाई केली आहे. यामध्ये मेस, कार्यालय, वर्गखोल्या तसेच ‘वेटिंग रूम’साठी (प्रतिक्षालयासाठी) केलेले वाढीव बांधकाम पाडण्यात आले. त्यामुळे आता शाळा बंद झाली असून पालक त्यांच्या मुलांना घरी घेऊन गेले आहेत. (ही कारवाई खरेतर महापालिकेकडून यापूर्वीच होणे अपेक्षित आहे ! – संपादक)

‘आम्ही पूर्ण पैसे भरले आहेत, तसेच आता परीक्षाही तोंडावर आहेत अशा परिस्थितीत आम्ही अभ्यास कुठे करायचा ?’, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी आणि पालक यांनी या कारवाईला विरोध केला आहे.