तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ
पुणे – सामाजिक माध्यमांतील ‘इन्स्टाग्राम’वर एका १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली. तिला लग्नाचे आमीष दाखवून वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी शफाक सय्यद याच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’सह विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट केली होती.
पीडित मुलगी ११ वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. १० वीचे ‘ऑनलाईन क्लासेस’ असल्याने मुलीला घरच्यांनी भ्रमणभाष दिला. ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांतून आरोपीची ओळख झाली. दरम्यान मागील काही दिवसांपासून पीडित मुलगी दबावाखाली दिसून आल्यामुळे तिला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर वरील प्रकार उघड झाला. हा प्रकार जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी केली तक्रार प्रविष्ट !पोलिसांनी अशा प्रकरणांची नोंद ‘लव्ह जिहाद’ म्हणून करणे आवश्यक ! पीडितेच्या घरचे भारती विद्यापीठ पोलीस चौकीमध्ये गेल्यानंतर पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत होते. तेव्हा पीडितेच्या नातेवाईकांनी ‘समस्त हिंदु बांधव संघटने’चे रवींद्र पडवळ, ‘गोरक्षा दल सामाजिक संस्था महाराष्ट्र’चे ऋषिकेश कामठे, ‘शिवकार्य प्रतिष्ठान’चे ऋषि भगने आणि कुणाल भालेराव यांचे साहाय्य घेतले. या सर्वांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर शफाक सय्यद याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. ( हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! पोलिसांची हिंदुद्वेष्टी वृत्ती पहाता यानंतर शफाक सय्यद याला शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा घेणे आवश्यक ! – संपादक) |
संपादकीय भूमिका :
|