ज्ञानवापीतील अन्य तळघरांच्या सर्वेक्षणाची हिंदु पक्षाची मागणी !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीतील बंद तळघरांचे भारतीय पुरातत्व विभागाने  सर्वेक्षण करावे, अशी मागणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. यावर ६ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. या प्रकरणी आता १५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

सौजन्य इंडिया टूडे 

सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाने युक्तीवाद करतांना सर्वेक्षणाच्या मागणीवर आक्षेप घेतला. ‘तळघरांचे सर्वेक्षण केल्यास ज्ञानवापीची हानी होईल’, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.

ज्ञानवापीमध्ये एकूण ८ तळघरे !

हिंदु पक्षाचे अधिवक्ता सौरभ तिवारी म्हणाले की, पुरातत्व विभागाने ज्ञानवापीच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार अहवालानुसार ज्ञानवापीमध्ये एकूण ८ तळघर आहेत. यापैकी एस्-१ आणि एन्-१ तळघरांचे सर्वेक्षण झालेले नाही; कारण या तळघरांत जाण्याचा मार्ग विटा आणि दगड यांद्वारे बंद करण्यात आला आहे. ज्ञानवापीमध्ये दिसणार्‍या तळघरांच्या व्यतिरिक्त इतर तळघर असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.