उतार वयातही ज्योतिष विद्या शिकण्याची आवड असणारे श्री. यशवंत कणगलेकरकाका (वय ७५ वर्षे) !

श्री. यशवंत कणगलेकर

गेल्या वर्षभरापासून माझ्या समवेत ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करणारे श्री. यशवंत कणगलेकरकाका (वय ७५ वर्षे) माझ्यापेक्षा सर्व दृष्टींनी ज्येष्ठ असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. मी त्यांना कुंडलीच्या विवेचनासंबंधी सुचवत असलेले पालट ते आनंदाने स्वीकारतात. त्या वेळी नवीन शिकायला मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो.

श्री. राज कर्वे

‘शिकण्याची वृत्ती कशी असावी ?’, हे शिकवण्यासाठीच देवाने मला काकांच्या समवेत सेवा करण्याची संधी दिली’, असे मला वाटते. याविषयी मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा.