लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावावर क्यू आर् कोडच्या (‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार विश्व हिंदु परिषदेने उत्तरप्रदेश पोलिसांकडे केली आहे.
We have send the formal complaint to the @dgpup and @Igrangelucknow to take immediate steps in the matter of faith. pic.twitter.com/Ul2IfEJ6u6
— विनोद बंसल Vinod Bansal (@vinod_bansal) December 31, 2023
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, काही लोक श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकांना क्यू आर् कोड पाठवून आणि त्याद्वारे पैसे घेऊन लोकांची फसवणूक केली जात आहे.