परराष्ट्रविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

१. ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल

ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल बघा. वर्ष २०२३ चा ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ (जागतिक भूकमारी अहवाल) प्रकाशित झाला. यामध्ये पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. हाच पाक ज्याचा ‘जीडीपी’ (सकल देशांर्तगत उत्पादन) विकासदर २ टक्के, बेरोजगारी २० टक्के, महागाई ११ टक्के आणि परकीय गंगाजळी ६ अब्ज डॉलर (५० सहस्र कोटी भारतीय रुपये) (भारताची गंगाजळी ७०० अब्ज डॉलर, म्हणजे ५८ लाख कोटी रुपये) आणि ५० टक्क्यांहून अधिक गरिबी, तसेच तेथील बहुसंख्य लोकांना खाण्या-पिण्याचे प्रश्न आहेत. असे असूनही हा देश भारताच्या पुढे आहे.

२. भारताची शस्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड !

भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड झाली. फिलिपाईन्स या देशानंतर भारत आता इंडोनेशियाला ‘ब्राह्मोस’ हे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकणार. विशेष म्हणजे हे दोन्ही देश प्रसिद्ध ‘आसियान’ या संघटनेचे सदस्य देश असून त्यांचा चीनसह समुद्र सीमावाद आहे.

३. ….अमेरिकेने भारतासारखे धाडस न दाखवल्याचा परिणाम !

भारताने यापूर्वी चतुराई आणि धाडस दाखवत ‘टिकटॉक’वर देशात बंदी घातली. हे धाडस अमेरिका दाखवू शकला नाही. आज ‘टिकटॉक’ अमेरिकेला अडचणीत आणत आहे. ज्या ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर ‘९/११’च्या आक्रमणाचे कारस्थान रचले, तोच ‘टिकटॉक’च्या माध्यमातून अमेरिकन तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे. अमेरिकेत ओसामाच्या एका ‘टिकटॉक’ लिखाणावर दीड कोटी ‘लाईक्स’ आले आहेत.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक (२.१२.२०२३)

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुक पानावरून साभार)