Google Account Policy : २ वर्षांपासून अधिक काळ जीमेल खाते वापरत नसल्यास गूगल ते १ डिसेंबरपासून बंद करणार !

नवी देहली : गूगलकडून अनेक वर्षे बंद असणारी जीमेल खाती बंद करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया १ डिसेंबरपासून चालू केली जाणार आहे. खाते हटवण्यापूर्वी गूगल ईमेल पाठवून या संदर्भात माहिती देईल आणि त्यानंतर ते बंद करील. गेल्या २ वर्षांपासून जीमेल खाते वापरले नसल्यास ते पुन्हा सक्रीय करता येऊ शकते. यासाठी गूगल ड्राइव्ह वापरणे, यू ट्यूबवर व्हिडिओ पहाणे किंवा छायाचित्रे शेअर करणे, प्ले स्टोरवरून अ‍ॅप डाउनलोड करणे किंवा गूगल सर्च वापरून माहिती शोधणे, हे पर्याय उपलब्ध आहेत. याखेरीज जीमेल खात्यातून कोणतेही उत्पादन किंवा सेवा खरेदी केली असल्यास खाते हटवले जाणार नाही.


क्लिक करा : Inactive Google Account Policy