इस्रायलविरोधातील युद्धात चेचन्याची उडी !

तालिबान, बोको हराम आदी आतंकवादी संघटनांनाही इस्रायलयविरुद्ध लढण्याचे आवाहन !

प्रतिकात्मक छायाचित्र

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल समर्थक देशांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर चेचन्याने आता हमासच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला आहे. चेचन्याचा नेता रमझान अखमाडोविच कादिराव्या उपाख्य ल्युल्या याने पाश्‍चात्त्य देशांना धडा शिकवण्यासाठी धोकादायक योजना आखली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडवण्याची चिन्हे आहेत. ल्युल्याने सिरियाच्या युद्धात गुंतलेल्या मुसलमानांना चिथावणी देऊन मध्य आणि पश्‍चिम आशियामध्ये मोठ्या युद्धाची घंटा वाजवली आहे. यामध्ये बोको हराम, हिज्बुल्ला, इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांसारख्या अनेक आतंकवादी संघटनांना गाझामधील इस्रायलच्या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.