सिंधुदुर्ग : मद्याची अवैध वाहतूक, दोघांना अटक

सावंतवाडी पोलिसांची कारवाई

सावंतवाडी – गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी इन्सुली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने आंध्रप्रदेश येथील कालापला राजेश आणि अप्पांना ससी किरण या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचे मद्य आणि १० लाख रुपये किमतीची गाडी, असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. १५ सप्टेंबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ?