नाशिक येथे ३ टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या !

नाशिक – सिन्नर तालुक्यातील ३ तरुणांच्या टवाळखोरीला कंटाळून शहा गावातील इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली. याविषयी तिने एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते. या प्रकरणी वैभव गोराणे, अंकुश धुळसुंदर आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा यांना कह्यात घेण्यात आले आहे.

या मुलांनी विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिला आणि तिच्या वडिलांना दमदाटी केली होती. ‘तुला जगण्याचा अधिकार नाही. तू जीव दे, नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो’, अशी धमकी दिल्याचे पोलीस अन्वेषणातून समोर आले आहे. त्यामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. ‘ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील आणि पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील’ या भीतीने मी आत्महत्या करत आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहिले होते.

संपादकीय भूमिका

तरुणींनो, टवाळखोरांच्या त्रासामुळे आयुष्य संपवण्यापेक्षा स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्यांना वेळीच प्रत्युत्तर द्या !