कथित आक्षेपार्ह भाषण केल्यावरून वेदिकेचे पदाधिकारी सतीश यांना अटक !

कर्नाटकमध्ये  हिंदु जागरण वेदिकेचा अखंड भारत संकल्प दिवस कार्यक्रम

दावणगेरे (कर्नाटक) – येथील गौरीबिदनुरू गावात १४ ऑगस्टच्या रात्री स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘अखंड भारत संकल्प दिवस’ साजरा करण्याचा कार्यक्रम हिंदु जागरण वेदिकेकडून घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून या संघटनेचे दक्षिण कर्नाटक सहसंचालक श्री. सतीश, तर मुख्य अतिथी म्हणून निवृत्त सैनिक सतीश बाबू उपस्थित होते. या वेळी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून श्री. सतीश यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अन्य धर्मियांच्या भावना दुखावून २ धर्मांमध्ये वैर निर्माण करणारे, चिथावणीखोर विधाने केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

श्री. सतीश यांनी यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते की, 

१. ‘दोनच अपत्ये पुरे’, असे आपण म्हणतो; परंतु काही व्यक्ती ४ विवाह करून ४० अपत्ये जन्माला घालतात. त्यामुळे जनसंख्येचा स्फोट झाल्यास देशाचे पुन्हा पाकिस्तानसारखे विभाजन होईल.

प्रतिकात्मक चित्र

२. केरळ, भाग्यनगर, कर्नाटकातील भटकळ, मंगळुरू येथील उल्लाळ येथेही फाळणीची मागणी केली जात आहे. बेंगळुरू येथील डिजे हळ्ळी आणि शिवाजीनगर संपूर्ण त्यांच्या (मुसलमानांच्या) वर्चस्वाखाली आहे. विचार करा १५ टक्के मुसलमान असलेल्या ठिकाणी तेथील हिंदू मोहरममध्ये त्यांच्या मिरवणुकीत सहभागी होतात; मात्र अकस्मात ते (मुसलमान) ३० टक्के झाल्यास गणपतीच्या मिरवणुकीत ‘तुम्ही आमच्या घरासमोरून जायचे नाही’, असे म्हणतील.

३. ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो,  कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही. (या भाषणात आक्षेपार्ह काय आहे ? जी सध्याची स्थिती आहे, तेच सतीश सांगत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदुत्वनिष्ठांसाठी पाकिस्तानी राजवट आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे थांबण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !