पाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या नावाखाली हिंदु तरुणाला अटक !

  • पाकिस्तानी हिंदूने इस्लामसंदर्भात केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यावरून मुसलमान जमाव संतप्त !

  • हिंदूने इस्लामविरोधी वक्तव्य केल्याचा २ साक्षीदारांना उभे करून एका मुसलमानाचा दावा !

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील अकबर राम नावाच्या हिंदु व्यक्तीने कथित रूपाने इस्लामचा अनादर केल्याच्या प्रकरणी त्याला ११ ऑगस्ट या दिवशी अटक करण्यात आली. पोलिसांनी या वेळी सांगितले की, संतप्त जमावाकडून त्याच्या जिविताला धोका होता. त्याला अटक केल्याने त्याचा जीव वाचला.

१. सिंध प्रांतातील रहिमयार खान जिल्ह्यातील ही घटना असून फैसल मुनीर नावाच्या मुसलमानाने पोलीस ठाण्यात येऊन अकबर राम याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्याचे म्हणणे होते की, रामने त्याच्या वाहन दुरुस्तीच्या दुकानात येऊन इस्लाम आणि मुसलमान यांची तीर्थक्षेत्रे यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्ये केली. यासाठी मुनीरने अन्य दोन साक्षीदारांनाही त्याच्यासमवेत ठाण्यात नेले होते. यामुळे अकबर रामच्या विरोधात त्वरित ईशनिंदेच्या कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

२. पोलीस निरीक्षक सफदर हुसेन यांनी सांगितले की, अकबर राम याला अटक करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो असता, घराबाहेर अनेक लोक जमा झाले होते. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणून अकबर रामला कह्यात घेतले. संतप्त जमाव ‘रामला आमच्याकडे स्वाधीन करा’, अशी मागणी करत होता. स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामच्या कुटुंबियांनी गाव सोडून पलायन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानात हिंदूंचा जीव किती असुरक्षित आहे, याचा अंदाज पाकिस्तानी पोलिसांच्या या वक्तव्यावरून येऊ शकतो. यावर उपाय योजण्यात भारतातील सर्वपक्षीय शासनकर्ते अपयशी ठरले असून केवळ हिंदु राष्ट्रातच सर्वत्रच्या हिंदूंचे रक्षण होणार आहे, हे जाणा !
  • पाकमध्ये ईशनिंदेच्या कायद्याच्या नावाखाली तेथील बहुसंख्य मुसलमान हिंदूंचा जीव घेण्यास तत्पर असतात. भारतात ते अल्पसंख्य असूनही ते हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी, कन्हैयालाल, उमेश कोल्हे यांचीही अशाच कारणांवरून हत्या करतात. ही परिस्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !