नूंह (हरियाणा) येथील दंगल आणि असुरक्षित हिंदू !

हरियाणातील नूंह येथील दंगलीतील काही दृश्‍ये

१. धर्मांधांकडून विविध राज्‍यांमध्‍ये पूर्वनियोजित हिंसाचार !

‘आधी काश्‍मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्‍त कावड घेऊन जात असतांना त्‍यांच्‍यावर दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला, वाहने जाळण्‍यात आली आणि हे आपण स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करत असतांना घडत आहे. ७५ वर्षांपूर्वी धर्माच्‍या आधारे देशाची फाळणी झाली. तेव्‍हा ‘आम्‍ही पाक (पवित्र) आहोत, तुम्‍ही नापाक आहात. पाक आणि नापाक एकत्र राहू शकत नाहीत. आम्‍ही पाक असल्‍याने पाकिस्‍तान निर्माण करू’, असे म्‍हणत वेगळा पाकिस्‍तान मागितला. आरोप-प्रत्‍यारोप केल्‍याने धार्मिक उन्‍माद थांबणार नाही. ‘ट्‍विटर ट्रेंडींग (ट्‍विटरवर घडवून आणलेली चर्चा)’, व्‍हॉट्‍सअ‍ॅपवर चित्रफीत प्रसारित करून आणि फेसबुकवर लिहून हे थांबणार नाही. तसेच लांबलचक आणि फार चांगले भाषण दिल्‍याने, ‘गंगा-जमुना तहजिब’ची (गंगा आणि यमुना या नद्यांच्‍या तिरांवर वास्‍तव्‍य करणार्‍या हिंदू आणि मुसलमान यांच्‍यातील कथित ऐक्‍य दर्शवणारी संस्‍कृती) गोष्‍ट केल्‍याने, तसेच बंधूभावाची मात्रा दिल्‍याने हा धार्मिक उन्‍माद थांबणार नाही.

२. हरियाणातील नूंह येथे ब्रजमंडल यात्रेवर धर्मांधांचे आक्रमण आणि त्‍यांनी घातलेला हैदोस !

हरियाणातील नूंह येथे प्रतिवर्षीप्रमाणे विश्‍व हिंदु परिषदेच्‍या नेतृत्‍वाखाली हिंदु मंडळांची ‘ब्रजमंडल यात्रा’ काढण्‍यात आली होती. ही यात्रा मार्गस्‍थ होत असतांना धर्मांधांनी काही वेळाने त्‍यावर आक्रमण केले. त्‍यांनी प्रचंड दगडफेक केली. ३ किलोमीटर परिसरात दिसेल त्‍याला आगी लावल्‍या आणि काही दुकानांमध्‍ये लूटमार केली. त्‍यांनी ‘हिरो’ आस्‍थापनाच्‍या शोेेरूममधून २०० दुचाकी पळवून नेल्‍या, तोडफोड केली आणि कर्मचार्‍यांना मारहाण केली. हा हिंसाचार एवढ्यावरच थांबला नाही. ५०० हून अधिक जमावाने धडक मारून पोलीस ठाण्‍याची भिंत पाडली, आत घुसून पोलिसांचे वाहन जाळले, तसेच तोडफोड करून आग लावण्‍याचा प्रयत्न केला. या हिंसाचारामध्‍ये २ होमगार्ड कर्मचार्‍यांसह ५ लोकांचा मृत्‍यू झाला. तसेच ५० हून अधिक पोलीस आणि अन्‍य घायाळ झालेे. परिस्‍थितीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी निमलष्‍करी दलाच्‍या २० तुकड्या तैनात करण्‍यात आल्‍या.

३. धर्मांधांसमोर पोलीस आणि प्रशासन हतबल !

पोलिसांसमोर वाहनांवर दगडफेक चालू राहिली. काही लोक सामाजिक माध्‍यमांवर साहाय्‍य मागत राहिले. राज्‍यात तात्‍काळ इंटरनेट बंद करण्‍यात आले. त्‍यानंतर मुख्‍यमंत्री खट्टर यांनी ‘ट्‍विटर’वर शांतता राखण्‍याचे आवाहन केले. येथे असा प्रश्‍न उपस्‍थित होतो की, एक तर इंटरनेट बंद आणि ते (मुख्‍यमंत्री खट्टर) ज्‍यांना आवाहन करत होेते, ते (धर्मांध) ट्‍वीट वाचतात का ? त्‍यामुळेच एका वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक संदीप देव यांनी ट्‍वीट करून विचारले, ‘हरियाणामध्‍ये रामरहिम यांच्‍या समर्थकांवर उघडपणे गोळीबार करणार्‍या खट्टर सरकारकडे गोळी-बंदूक नव्‍हत्‍या का ?’ गुन्‍हे शाखेच्‍या पोलीस अधिकार्‍याच्‍या पोटात गोळी लागली आणि पोलीस घटनास्‍थळापासून पळून गेले. नूंहच्‍या नल्लर महादेव मंदिरातून ब्रजमंडल यात्रा निघणार होती आणि त्‍यात २० सहस्र लोक सहभागी होतात, हे सर्वांना ठाऊक होते; पण त्‍याची सिद्धता पोलिसांनी नाही, तर धर्मांधांनी केली होती. यासाठी त्‍यांनी अनेक दिवसांपासून नियोजन केले होते. ही यात्रा पुढे जाऊन केवळ १ किलोमीटर चालली नाही, तोच तिच्‍यावर आक्रमण झाले. प्रत्‍येकाला पळवून पळवून मारण्‍यात येत होते. विश्‍व हिंदु परिषदेच्‍या मते ही दंगल पूर्वनियोजित होती.

नूंह दंगलीच्‍या काही चित्रफिती प्रसारित झाल्‍या. त्‍यात काही धर्मांध युवक छतावरून दगडफेक करत असल्‍याचे दिसतात. या छतांवर आधीपासूनच दगड गोळा करून ठेवण्‍यात आले होते. या मुलांची दगडफेक करण्‍याची पद्धत देहली दंगलीप्रमाणे होती. देहली दंगलीमध्‍ये घरांवरून दगड आणि पेट्रोल बाँब फेकण्‍यात आले होते. त्‍यात ५० हून अधिक लोक ठार झाले होते. ‘नूंहमध्‍ये संवेदनशील भाग असतांना सरकारने पर्यायी उपाययोजना का केली नव्‍हती ?’, असा प्रश्‍न विचारावासा वाटतो.

४. धर्मांधांच्‍या सततच्‍या आक्रमणांपासून हिंदूंना वाचवण्‍यासाठी सरकारने ठोस कृती करणे आवश्‍यक !

भारताचे हे (मेवात) असे क्षेत्र आहे, जेथे पोलीस जाऊ शकत नाहीत. तेथे ‘एअर लिफ्‍ट’ची (विमानाने नागरिकांची ने-आण करणे) गोष्‍ट करण्‍यात येत आहे आणि लवकरच भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्‍यवस्‍था बनेल, असा दावा करण्‍यात येत आहे. तेव्‍हा असा प्रश्‍न विचारावासा वाटतो, ‘जेव्‍हा हिंदूच असणार नाहीत, तर ती मोठी अर्थव्‍यवस्‍था कुणाच्‍या कामी येणार आहे ?’ एका हिंदुत्‍वनिष्‍ठ नेत्‍याने यांनी ट्‍वीट करून म्‍हटले, ‘यामागे तेच लोक आहेत, जे मेवातला ‘मिनी (छोटे) पाकिस्‍तान’ बनवण्‍याचा प्रयत्न करत आहेत.’ त्‍याला प्रत्‍युत्तर देतांना एकाने म्‍हटले, ‘सरकार तुमचे आहे. मग आतापर्यंत गुन्‍हेगार पकडले जायला पाहिजे होते.’ काहींनी ट्‍वीटला असेही उत्तर देतांना म्‍हटले, ‘यांना त्‍यांच्‍या हिंदु मतांची कोणतीही चिंता नसते. हिंदूंची मते कुठेही जाणार नाहीत, असे त्‍यांना वाटते आणि असा विचार करता करता ते अनेक राज्‍यांमध्‍ये सरकारे गमावून बसले आहेत.’

५. धर्मांधांच्‍या आमिषांना न फसता वेळीच कठोर कारवाई करणे आवश्‍यक !

काहीही असो, धर्मांध दुचाकी लुटण्‍यात आणि हिंसाचार करण्‍यात यशस्‍वी राहिले. नूंह आणि मेवात हा तोच भाग आहे, जेथे एका मागोमाग गुन्‍हे घडत असतात. तेथे अनेक वेळा ‘व्‍हिक्‍टिम कार्ड’ही (फसवण्‍यासाठी युक्‍त्‍या) खेळले जाते. मागील वेळी मेवातमध्‍ये एक पोलीस उपअधीक्षक सुरेंदर सिंह यांना डंपर खाली चिरडून मारण्‍याचे प्रकरण समोर आले होते. सुरेंदर सिंह अनधिकृत उत्‍खनन थांबवण्‍यासाठी गेले होते; परंतु लोकांनी त्‍यांच्‍यावर अनेक डंपर चढवले. त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला होता. तेव्‍हाच कृती केली असती, तर आज ही दंगल झाली नसती. आता कारवाई झाली, तर पुन्‍हा तीच ‘फसवण्‍याची क्‍लृप्‍ती’ वापरली जाईल, ‘तुम्‍ही आमचे स्‍वयंपाकघर आणि प्रसाधनगृह बघा, आमची परिस्‍थिती किती वाईट आहे, आम्‍ही असे कसे करू शकतो ? आम्‍ही गरीब मुसलमान आहोत. आम्‍हाला जाणूनबुजून त्रास दिला जात आहे.’ असे एकाने  बोलायला प्रारंभ केल्‍यावर हळूहळू गर्दी जमत जाते आणि सर्व एका सुरात ‘व्‍हिक्‍टीम कार्ड’ खेळणे चालू करतात. आधी दंगल, लूटमार केली जाते, नंतर गरिबीचे रडगाणे गायले जाते. नंतर मुसलमान देश वक्‍तव्‍य करतात, ‘भारतात मुसलमान सुरक्षित नाहीत.’ साम्‍यवादी याला विद्वेषाच्‍या राजकारणाचा भाग असल्‍याचे सांगतात. सामाजिक कार्यकर्ते ‘मुसलमान फार घाबरलेले आहेत’, असे सांगतात. यानंतर शांतीचे आवाहन करण्‍यात येईल. आता पुढच्‍या घटनेची वाट पहा.’

नूंह येथे धर्मांधांनी केलेल्‍या हिंसाचाराविषयी विश्‍व हिंदु परिषदेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता आलोक कुमार हे चेतावणी देतांना म्‍हणाले, ‘‘आम्‍ही केवळ सरकारवर अवलंबून नाही, तर आम्‍हालाही स्‍वसंरक्षण करण्‍याचा अधिकार आहे. हिंदू त्‍यांच्‍या आत्‍मरक्षणाच्‍या अधिकाराचा उपयोग करून अशा प्रकारच्‍या आक्रमणांचा सामना करतील आणि त्‍याचे दायित्‍व आमच्‍यावर नसेल. आम्‍ही निश्‍चितपणे मेवातला हिंदूंचे क्षेत्र बनवण्‍याचा प्रयत्न करू.’’

(साभार : ‘रंग दे बसंती’ यू ट्यूब वाहिनी)

संपादकीय भूमिका

देशात अनेक ठिकाणी पूर्वनियोजित दंगली होऊनही त्‍यांचा सुगावा प्रशासनाला न लागणे लज्‍जास्‍पद !