|
इंफाळ (मणीपूर) – ‘कुकी पीपल्स अलायन्स’ या ख्रिस्ती कुकींच्या पक्षाने सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला असलेले समर्थन काढल्याचे घोषित केले आहे. ६ ऑगस्टच्या रात्री त्यांनी राज्यपालांना भेटून याविषयी लिखित पत्र दिले. ‘सध्या राज्यात चालू असलेल्या हिंसाचारावरून सत्ताधारी पक्षाला असलेल्या आमच्या समर्थनास काही अर्थ रहात नाही’, असे पक्षाने पत्रात म्हटले आहे. विधानसभेत ‘कुकी पीपल्स अलायन्स’चे एकूण २ आमदार आहेत.
मणिपुर में सीएम एन बीरेन सिंह की सरकार को बड़ा झटका #Manipur #NDA https://t.co/pI4vnkTdaM
— AajTak (@aajtak) August 6, 2023
या जोडीला २१ ऑगस्टपासून चालू होत असलेल्या मणीपूर विधानसभा अधिवेशनाला सदनातील सर्व १० कुकी आमदार पाठ फिरवणार असल्याचेही बोलले जात आहे. या १० आमदारांपैकी ७ आमदार भाजपचे आहेत. सतत चालू असलेल्या हिंसाचारावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. चुराचांदपूर या हिंसाचारामुळे सर्वाधिक प्रभावित जिल्ह्याचे भाजपचे आमदार एल्.एम्. खौट म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था यांची सद्य:स्थिती पहाता मी अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाही. वेगळ्या प्रशासनिक व्यवस्थेची कुकींची मागणी मान्य करण्यात न आल्याने मी अधिवेशनात सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपादकीय भूमिका
|