हरियाणातील १४ गावांमध्ये मुसलमानांवर बहिष्कार !

  • नूंह येथील हिंसाचाराचे प्रकरण

  • मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर न ठेवण्याचे आवाहन

चंडीगड – हरियाणातील नूंह येथे झालेल्या हिंसाचारानंतर त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्येही तणावाचे वातावरण असून हिंदूंमध्ये संतापाची भावना आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महेंद्रगड, झझ्झर आणि रेवाडी या ३ जिल्ह्यांमधील १४ गावांनी मुसलमानांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांमध्ये ठिकठिकाणी ग्रामसभांचे आयोजन करून हा निर्णय घेण्यात आला. नूंह येथील हिंसाचाराचा फटका या ३ जिल्ह्यांतील हिंदूंना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या १४ गावांमधील हिंदूंनी मुसलमानांना भाड्याने खोल्या न देण्याचे, तसेच नोकरीवर मुसलमानांना न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुग्राममधील तिघरा गावात महापंचायत

नूंह येथील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर गुरुग्राममधील तिघरा गावात हिंदु समाजाने महापंचायत बोलावली होती. या महापंचायतीमध्ये विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल आणि हिंदु ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी उपस्थित हिंदूंनी मुसलमानांवर आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. या वेळी गावातील सेक्टर-५७ मध्ये स्थित असलेली अंजुमन मशीद पाडण्याची मागणी महापंचायतीत करण्यात आली. ‘हा भाग हिंदूबुहल असल्यामुळे येथे मशीद नको’, असे महापंचायतीत उपस्थित लोकांचे म्हणणे होते.

काँग्रेसचा आमदार मम्मन खान याला अटक का नाही ?

नूंह येथे झालेल्या हिंसाचारानंतर त्याचे लोण आजूबाजूच्या गावांमध्ये पसरले. गुुरुग्राममध्येही हिंसाचार झाला. याला पोलीस उत्तरदायी आहेत; मात्र त्याचे खापर हिंदूंवर फोडण्यात आले, असे महापंचायतीत सहभागी झालेल्या हिंदूंचे म्हणणे होते. मुसलमानांनी नियोजन करून हिंसाचार केला; मात्र गुुरुग्राममध्ये पोलिसांनी ४ हिंदु मुलांना अटक केली. याच पोलिसांनी नूंह येथे हिंसाचार भडकावण्यास उत्तरदायी असणारा काँग्रेसचा आमदार मम्मन खान याला मात्र अटक केलेली नाही. पोलिसांनी या दंगलीच्या प्रकरणात ज्या निरपराध हिंदूंना पकडले आहे, त्यांच्या सुटकेसाठी पोलिसांना ७ दिवसांची समयमर्यादा दिली आहे. त्यांना ७ दिवसांत न सोडल्यास महापंचायत कठोर निर्णय घेईल, अशी तंबी या महापंचायतीत पोलिसांना देण्यात आली आहे. दंगलीच्या प्रकरणात निरपराध हिंदूंना पकडणार्‍या पोलिसांविषयी हिंदूंनी संताप व्यक्त केला.

संपादकीय भूमिका

मुसलमानांवर बहिष्कार टाकल्यामुळे सर्वधमसमभाववाले चवताळून उठतील आणि हिंदूंना ‘धर्मांध’ ठरवून त्यांना दोष देतील; मात्र हिंदूंवर ही वेळ का आली ?’, याचा विचार निधर्मीवादी, समाजवादी करणार आहेत कि नाही ?