हिजाबऐवजी गणवेशात येण्याचे आवाहन करणार्‍या मुख्याध्यापकाच्या कार्यालयाचीच मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड !

त्रिपुरा राज्यातील सिपाहीजला येथील घटना

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

आगरतळा (त्रिपुरा) – राज्यातील सिपाहीजला या जिल्ह्यात असलेल्या कोरोइमुरा उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रियतोष नंदी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना हिजाबऐवजी शाळेच्या गणवेशात येण्यास सांगितले होते. हिजाब परिधान करण्यापासून रोखण्यात आल्याने मुसलमान विद्यार्थिनींच्या एका गटाने संतप्त होऊन मुख्याध्यापकांच्या खोलीची तोडफोड केली. यामध्ये काही मुसलमान विद्यार्थीही सहभागी झाले.

या घटनेनंतर त्यातील एक मुसलमान विद्यार्थी शाळेच्या आवारातून बाहेर आला असता विश्‍व हिंदु परिषदेच्या काही हिंदुत्वनिष्ठांनी त्याच्यावर कथित रूपाने आक्रमण केल्याचा दावा केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण चालू आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच या घटनेला कोणतीही धार्मिक बाजू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमान विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेतल्यावरून नव्हे, तर मुख्याध्यापकांनी त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, यावरून ओरड झाली, तर नवल वाटू नये !
  • अशा घटनांतून मुसलमान विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा उद्दामपणा स्पष्ट होतो. त्यांना ठाऊक आहे की, देशातील धर्मनिरेपक्षतावादी पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार आहेत. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवरच आता प्रतिबंध लादला पाहिजे !