हिंदु देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह संभाषण करणारा धर्मांध अटकेत !

  • मोखाडा (जिल्हा ठाणे) येथील हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र विरोधाचा परिणाम !

  • हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर पोलिसांची कारवाई

ठाणे, ३० जुलै (वार्ता.) – हिंदु देवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह संभाषण केल्याची ध्वनीफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याचा निषेध करत २८ जुलैला मोर्चा काढला होता, तसेच संबंधिताला अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनही मोखाडा पोलिसांना दिले होते. यासह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘मोखाडा बंद’ची हाक देत २९ जुलैला मोखाडा बाजारपेठ बंद ठेवली होती. आक्षेपार्ह संभाषणातील संशयित उमेर मन्सुरी (वय १९ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली असून मोखाडा येथे तणावपूर्ण शांतता आहे. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर कारवाई करणारे पोलीस काय कामाचे ? छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांचा अवमान होऊनही कारवाई न करणार्‍या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !