‘लव्‍ह जिहाद’चे जागतिक षड्‍यंत्र रोखा !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’विषयी करण्‍यात आलेले उद़्‍बोधन

‘द केरल स्‍टोरी’ या चित्रपटाने भारतातील ‘लव्‍ह जिहाद’चे षड्‍यंत्र आणि त्‍याचा ‘इस्‍लामिक स्‍टेट’च्‍या जागतिक आतंकवादाशी संबंध सिद्ध करून दाखवला; मात्र तथाकथित निधर्मीवाद्यांकडून या चित्रपटाला अनेक ठिकाणी विरोध करण्‍यात आला, कुठे बंदी घालण्‍यात आली, तर कुठे चित्रपटगृहांनी दाखवण्‍यास नकार दिला. मुसलमान मतपेढी टिकवून ठेवण्‍यासाठी चित्रपटाला विरोध करण्‍यात आला. येथे आपण लक्षात घेतले पाहिजे की, जे निधर्मीवादी हा चित्रपट स्‍वीकारायला सिद्ध नाहीत, ते प्रत्‍यक्षातील लव्‍ह जिहादची भयानकता कसे स्‍वीकारतील ? ते हिंदु मुलींच्‍या रक्षणासाठी प्रयत्न करतील का ? याचाच परिणाम म्‍हणून देशभरात लव्‍ह जिहादच्‍या घटनांनी थैमान घातले आहे.

२३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘हिंदु भगिनी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसण्‍याचे कारण, लव्‍ह जिहाद करण्‍यासाठी मुसलमानांकडून केल्‍या जाणार्‍या युक्‍त्‍या, जगभरातील लव्‍ह जिहादचे संकट’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा भाग १ : https://sanatanprabhat.org/marathi/704075.html


४. लव्‍ह जिहादच्‍या माध्‍यमातून आतंकवादाचा प्रचार होत असल्‍याचा कॅथॉलिक चर्चचा आरोप

श्री. आनंद जाखोटिया

‘केरळ राज्‍यातील ख्रिस्‍ती महिलांना मोठ्या संख्‍येने फसवून इस्‍लामिक स्‍टेटच्‍या आतंकवादी कारवायांमध्‍ये ढकलले जात आहे’, असा दावा कॅथॉलिक चर्चने केला आहे.

कार्डिनल जॉर्ज ऐलनचैरी अध्‍यक्ष असणार्‍या ख्रिस्‍ती संस्‍थेने केरळ सरकारवर आरोप ठेवतांना म्‍हटले, ‘ते (सरकार) लव्‍ह जिहादच्‍या प्रकरणांना गांभीर्याने घेत नाहीत.’ त्‍यांनी पोलीस नोंदीचे उदाहरण देऊन सांगितले की, ज्‍या २१ लोकांना ‘आय.एस्.आय.एस्.’ या आतंकवादी संघटनेत भरती करण्‍यात आले होते, त्‍यातील अर्धे धर्मांतरित ख्रिस्‍ती होते. या घटनेने संपूर्ण समाजाचे डोळे उघडायला पाहिजे. हे एक गंभीर प्रकरण आहे. लव्‍ह जिहाद हा काल्‍पनिक नाही.’ चर्चनेही लव्‍ह जिहादमध्‍ये सहभागी दोषींच्‍या विरोधात त्‍वरित कारवाई करण्‍याची मागणी केली.

५. ‘लव्‍ह जिहाद’मागील अपरिचित कारणे

इस्‍लामचे राज्‍य जगभरात निर्माण करणे, हा त्‍यांचा मूळ उद्देश असला, तरी तो साध्‍य करण्‍यासाठी लहान लहान माध्‍यमांचा वापर केला जात आहे.

५ अ. झारखंड आणि छत्तीसगड यांसारख्‍या राज्‍यांमध्‍ये वनवासींच्‍या भूमी बळकवण्‍याचे षड्‍यंत्र : झारखंड आणि छत्तीसगड राज्‍यांमध्‍ये बंदी घातलेल्‍या ‘पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे (‘पी.एफ्.आय.’चे) सदस्‍य अत्‍यंत मागास भागातील वनवासी जमातींच्‍या (ट्रायबल) मुली आणि महिला यांच्‍याशी लग्‍न करत आहेत. हे वनवासी समाजाचे लोक भोळे असल्‍याने त्‍यांना मुसलमानांचे षड्‌यंत्र लक्षात येत नाही. गुप्‍तचर विभागाच्‍या सूत्रांनुसार ‘पी.एफ्.आय.’च्‍या सदस्‍यांनी वनवासी महिला आणि मुली यांच्‍याशी लग्‍न केल्‍याची १ सहस्र प्रकरणे समोर आली आहेत. ‘वनवासी जमातीच्‍या युवतींशी फसवून लग्‍न करणे आणि नंतर त्‍यांच्‍याद्वारे जंगलातील वनभूमी कह्यात घेणे’, हा त्‍यांचा उद्देश आहे. आज ज्‍याप्रकारे जंगलांतून वनवासी जमातींच्‍या माध्‍यमातून नक्षलवाद वाढवण्‍यात आला, त्‍याच प्रकारे आदिवासी आणि अल्‍पसंख्‍यांक यांच्‍या नावावर भारताच्‍या विरोधात जिहाद चालू करण्‍याची त्‍यांची नवीन योजना आहे.

५ आ. बांगलादेशींनी लव्‍ह जिहादच्‍या माध्‍यमातून नागालँडमध्‍ये भूमी बळकावण्‍याचा प्रयत्न करणे : ‘नागालँडमध्‍ये कामासाठी येणारे बांगलादेशी मुसलमान स्‍थानिक नागा मुलींना फूस लावून त्‍यांच्‍याशी लग्‍न करतात’, असा तेथील स्‍थानिक जमातींचा आरोप आहे. या लग्‍नांचे प्रमाण एवढे अधिक आहे की, आता ‘सेमा’ किंवा ‘सुमी’(नागा जमाती)ची मुलगी आणि बंगाली मुसलमान पुरुष यांच्‍यातील लग्‍नांमुळे ‘सुमिया’ नावाची नवीन नागा जमात निर्माण झाली आहे.

५ इ. लव्‍ह जिहादमागील एक प्रमुख कारण – अनुवंशिक रोगांपासून मुसलमान मुलांना वाचवणे : लव्‍ह जिहादच्‍या ज्‍या विविध कारणांची चर्चा होते, त्‍यात चर्चेत न येणारे; पण महत्त्वाचे एक कारण आहे, ‘कॉन्‍सेंग्‍युनियस मॅरेज’मुळे (Consanguineous marriage – ‘कुटुंबातील व्‍यक्‍तींशी निकाह’मुळे) मुसलमान मुलांना होणार्‍या अनुवंशिक रोगांपासून त्‍यांना वाचवणे. मुसलमान कुटुंबांमध्‍ये ‘कॉन्‍सेंग्‍युनियस मॅरेज’ अर्थात् सख्‍ख्‍या, चुलत आणि मावस बहिणींशी निकाह करण्‍याची प्रथा आहे. आरोग्‍यतज्ञांच्‍या मते या ‘इंब्रिडिंग’मुळे (inbreeding – जवळच्‍या नात्‍यांमधील प्रजननामुळे) मुसलमानांमध्‍ये अनुवंशिक आजारांची प्रमाणे वाढली आहेत. परिणामी त्‍यांच्‍या आजच्‍या पिढीतील बरीच मुले अनुवंशिक रोगांनी ग्रस्‍त होत आहेत. त्‍यात रक्‍तविकार, शिकण्‍यास सक्षम नसणे, आंधळेपणा, बहिरेपणा आदी समस्‍या आहेत.

मुसलमानांमध्‍ये वाढती अनुवंशिक आजारांची समस्‍या पाहून इस्‍लामच्‍या जागतिक वर्चस्‍वाला आव्‍हान निर्माण झाले आहे. त्‍यामुळेही ‘लव्‍ह जिहाद’च्‍या, तसेच धर्मांतराच्‍या माध्‍यमातून हिंदु-ख्रिस्‍ती मुलींना मुसलमान बनवून त्‍यांच्‍या गर्भातून सुदृढ इस्‍लामी वंश निर्माण करण्‍याचा प्रयत्न चालू आहे.

६. लव्‍ह जिहादमुळे होणारी हानी – हिंदु संस्‍कारांची ‘जीन (जनुकीय) बँक’ नष्‍ट होणे

आपल्‍या एका हिंदु भगिनीने मुसलमानाशी निकाह करणे, म्‍हणजे तिच्‍यातील संस्‍कारी हिंदु वंश उत्‍पन्‍न करण्‍याच्‍या क्षमतेचा नाश होऊन तिच्‍याकडून इस्‍लामी वंशाचा प्रारंभ होणे आहे. आमीर खाननेही एका संवादात स्‍पष्‍टपणे सांगितले, ‘माझी पत्नी हिंदु असू शकते; पण माझी मुले ही मुसलमानच असतील !’ यातून स्‍पष्‍ट होेते की, हिंदु युवतींनी लव्‍ह जिहादमध्‍ये निकाह केल्‍याने हिंदूंची संस्‍कारी ‘जीन बँक’ नष्‍ट होत आहे.

७. भारतातून बेपत्ता होणार्‍या महिलांची प्रचंड संख्‍या आणि त्‍यांचे पुढे काय होते ?

अ. राष्‍ट्रीय गुन्‍हेगारी नोंदणी विभागाच्‍या अहवालानुसार महाराष्‍ट्र, बंगाल आणि मध्‍यप्रदेश या ३ राज्‍यांमध्‍ये ३ वर्षांत सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्‍या आहेत. वर्ष २०१६ मध्‍ये महाराष्‍ट्रात २८ सहस्र ३१६, वर्ष २०१७ मध्‍ये २९ सहस्र २७९ आणि वर्ष २०१८ मध्‍ये ३३ सहस्र ९६४ महिला बेपत्ता झाल्‍या आहेत. मुंबईमध्‍ये वर्ष २०१७ आणि २०१८ मध्‍ये ४ सहस्र ७१८ अन् ५ सहस्र २०१ महिला बेपत्ता होण्‍यासह अशा घटनांची सर्वाधिक संख्‍या नोंदवली गेली आहे. बंगालमध्‍ये वर्ष २०१६ ते २०१८ या कालावधीत बेपत्ता महिलांची संख्‍या क्रमशः २४ सहस्र ९३७, २८ सहस्र १३३ आणि ३१ सहस्र २९९ होती. मध्‍यप्रदेशात या ३ वर्षांमध्‍ये महिलांच्‍या बेपत्ता होण्‍याच्‍या २१ सहस्र ४३५, २६ सहस्र ५८७ आणि २९ सहस्र ७६१ तक्रारी नोंदवल्‍या गेल्‍या. या ३ राज्‍यांतच लाखोंच्‍या संख्‍येने महिला बेपत्ता झाल्‍याच्‍या नोंदी असूनही त्‍या संदर्भात उपाययोजना दिसत नाही.

आ. एवढ्या मोठ्या संख्‍येने देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईतून आणि अन्‍य राज्‍यांतील महिला गायब होत आहेत, तर हा विषय गांभीर्याने का घेतला जात नाही ? ‘लव्‍ह जिहाद’शी याचा संबंध तपासून का पाहिला जात नाही ?

८. लव्‍ह जिहाद थांबवण्‍यासाठी मुलींना हिंदूंचा इतिहास आणि महाराणी पद्मावतीने केलेले बलीदान सांगणे आवश्‍यक !

आपल्‍या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्‍याग सांगावा लागेल.

राणी पद्मावतीने अल्लाउद्दीन खिलजीची बेगम (पत्नी) होऊन जगण्‍यापेक्षा जोहार करून अग्‍नीत जळून मरणे पसंत केले होते. तिच्‍या समवेत १ सहस्र ६०० क्षत्रिय स्‍त्रियांनीही जोहार केला होता. यातून मुसलमानांपुढे न झुकणार्‍या आणि शीलरक्षणासाठी बलीदान करणार्‍या आपल्‍या हिंदु विरांगनांची मानसिकता लक्षात येऊ शकते, तर मग आज आमच्‍या भगिनी अब्‍दुल, सलीम, सलमान यांच्‍या मागे का लागत आहेत ? म्‍हणून त्‍यांना आपल्‍या वीरमाता आणि वीरपुरुष यांचे स्‍मरणही करायला सांगा.

लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी त्‍याच्‍या विरोधात मोहीम राबवायला हवी. या मोहिमेत हिंदु युवतींमध्‍ये लव्‍ह जिहादच्‍या संदर्भात जागृती, त्‍यांचे हिंदु धर्मशास्‍त्रांच्‍या संदर्भात प्रशिक्षण, विविध समाजांमध्‍ये जाऊन प्रबोधन आणि संघटन, स्‍वसंरक्षण प्रशिक्षण, लव्‍ह जिहाद्यांना रोखण्‍यासाठीचे आंदोलन; ज्‍या हिंदु मुलींना पुन्‍हा हिंदु धर्मात प्रवेश घ्‍यायचा आहे, त्‍यांच्‍यासाठी घरवापसीची योजना, लव्‍ह जिहादच्‍या विरोधात बनवलेले कायदे कठोर करण्‍यासाठीचे प्रयत्न, अशा विविध प्रकारे आपल्‍याला लव्‍ह जिहाद रोखण्‍यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच प्रत्‍यक्ष कृती करून या धर्मसंकटाचा संघटितपणे सामना करावा लागेल !

– श्री. आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती.