चीन नेपाळमार्गे भारतात करत आहे टोमॅटोची तस्करी !

डावपेचात पुढे असलेला चीन !

नवी देहली – संपूर्ण देशात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. याच अपलाभ घेत चीनने नेपाळमार्गे भारतात टोमॅटोंची तस्करी चालू केली आहे. टोमॅटोंची वाहतूक नेपाळ आणि बिहार येथील मनुष्यविरहित सीमेवरून केली जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर टोमॅटोंची तस्करी रोखण्यासाठी सशस्त्र सीमा दलाच्या सैनिकांनी गस्त अधिक कडक केली आहे.

भारतात टोमॅटोच्या किमती वाढल्यापासून चीनने नेपाळला पाठवल्या जाणार्‍या टोमॅटोच्या खेपेत वाढ केली आहे. नेपाळ सीमेजवळ रहणार्‍यांनी सांगितले की, नेपाळमध्ये टोमॅटो ५ रुपये किलो दराने मिळत आहे; मात्र भारतात तस्करी व्हायला लागल्यापासून नेपाळमध्येही टोमॅटोंचे दर वाढू लागले आहेत.