‘साधकांनी त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे तत्परतेने पुढे लिहून द्यायला हवीत. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ही सूत्रे पुष्कळ मोठ्या समष्टीपर्यंत पोचून सर्वांनाच शिकायला मिळते. यामुळे वाचणार्यांना प्रेरणा मिळते आणि साधना अन् सेवा करण्याचा त्यांचा उत्साह वाढतो. साधकांनी त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित लिहून देणे, ही त्यांची समष्टी साधनाच आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.६.२०२३)