बुंदी (राजस्थान) येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

बुंदी (राजस्थान) – येथील तीखा बरडा भागामध्ये एका १२ वर्षांच्या मुलावर ३ भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केल्याने त्याचा मृत्यू झाला. या कुत्र्यांनी या मुलाच्या डोक्यावर ६० ठिकाणी चावे घेतले. त्याच्या शरिरावर २२ ठिकाणी जखमा केल्या. मुलाला घायाळ स्थितीत रुग्णालयात नेले असता उपचार चालू असतांना त्याचा मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका

मानवतेच्या नावाखाली भटक्या कुत्र्यांना अभय देणारी व्यवस्था अशा घटनांमुळे हास्यास्पद ठरते, हे लक्षात घ्या ! भटक्या कुत्र्यांची ही प्राणघातक समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !