मी सहज म्हणून माझ्या नातीला (इयत्ता २ रीतील) ‘सी.बी.एस्.ई. (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)’च्या शाळेतून मिळालेली पुस्तके चाळत बसलो होतो. त्यात ‘मेधा’ (बुद्धी) नावाचे एक पुस्तक होते. या पुस्तकात नैतिक मूल्ये, जीवनकौशल्ये आणि व्याकरण शिकवणारे काही धडे आहेत. अकबर-बिरबल यांच्याशी संबंधित कथा, पंचतंत्रातील एक कथा अशा काही बोधकथा आणि इतर भरपूर लिखाण आहे; पण भारतात साजरे होणार्या सणांची माहिती देतांना मुसलमान धर्मियांच्या ‘ईद’ या सणाची माहिती दिली आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटले. हिंदु, बौद्ध, जैन, शीख बहुल असणार्या या देशात मुसलमान धर्मियांच्या सणाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यामागे कोणता उद्देश असावा ? हे समजले नाही. याविषयी विचार करतांना लक्षात आलेली पुढील सूत्रे या लेखाद्वारे मांडलेली आहेत.
१. ‘ईद’ या सणाची माहिती शालेय अभ्यासक्रमातून देणे हे धर्मनिरपेक्षतेत कुठे बसते ?
पाकिस्तान, बांगलादेश या मुसलमान देशांतील शालेय अभ्यासक्रमात हिंदु सणांची कधी माहिती दिली जाते का ? तिथे तर लहान मुलांना विकृत इतिहास शिकवून त्यांच्या मनात हिंदुद्वेषाचे बीज रोवले जाते; पण आपल्या देशात धर्मनिरपेक्षतेला जणू ऊत आला आहे. हिंदु समाजाइतका उत्सवप्रिय समाज कुठेही आढळणार नाही. प्रत्येक मासात एक तरी सण अथवा उत्सव असतो. गुढीपाडवा, दीपावली, दसरा, होळी, गणेशोत्सव, मकरसंक्रांत आदी किती म्हणून नावे सांगावीत ? विशेष म्हणजे हिंदूंचे प्रत्येक सण हे विज्ञान, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, तसेच सामाजिक सौहार्द यांच्या भक्कम पायावर आधारित आहेत. बौद्ध धर्मात बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन असे अनेक सण साजरे केले जातात. जैन धर्मात पर्युषण पर्व, महामस्थाभिषेक, संवस्तरी महापर्व म्हणजे दिवाळी इत्यादी अनेक सण साजरे केले जातात. शीख धर्मात १० गुरूंची जयंती आणि पुण्यतिथी, ‘गुरुग्रंथसाहेबा’चा प्रतिष्ठापना दिवस, खालसा स्थापना दिवस, बैसाखी इत्यादी सण साजरे केले जातात. मग या सणांपैकी एका सणाची माहिती ‘मेधा’ पुस्तकात देता आली नसती का ?
२. ‘ईद’ सण भाईचार्याची शिकवण देत असतांना तिचे पालन न करणारे मुसलमान !
‘मेधा’ या पुस्तकात ‘ईद’ या सणाची माहिती देतांना सांगितले आहे की, हा सण भाईचार्याची शिकवण देतो. या सणाचा उद्देश केवळ खाणे-पिणे हा नसून भातृभावना आणि प्रेमभावना वाढवणे हा आहे. हा सण लोकांच्या मनात विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करतो. ‘ईद’ या सणाच्या उद्देशात सत्यता असेलही; पण मुसलमान धर्मियांच्या अनुयायांनी या उद्देशाचे पालन केले असते, तर या सणाच्या माहितीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याविषयी आक्षेप घेण्याचे काही कारण उरले नसते; कारण हिंदु धर्म आणि समाज मूलतः सहिष्णु आहे. त्यामुळे या देशाने सर्व धर्मियांच्या विस्थापितांना या देशात उदारपणे आश्रय दिला.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अल्ला आणि येशू यांना मान्यता देण्याचे; पण सत्य बाजूही स्पष्टपणे सांगणारे विधान !
स्वातंत्र्यवीर सावरकर एकदा म्हणाले होते, ‘३३ कोटी देव मानणार्या हिंदूंना अल्ला आणि येशू यांना मान्यता देणे तसे अवघड नाही; पण मुसलमान धर्मियांनी फक्त एकच ईश्वर अन् एकच धर्मग्रंथ मानायचा, तसेच इतर धर्मियांना ‘कत्तल योग्य’ आणि त्यांच्या ‘धर्मग्रंथांना जाळण्यायोग्य’ समजायचे, हे कसे मान्य होणार ?’
४. भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांचा कोणताही अनुभव हिंदूंना मुसलमानांकडून आलेला नाही !
‘ईद’ या सणाची माहिती देतांना ‘इस्लाम हा भाईचारा शिकवणारा धर्म आहे’, असे म्हटले आहे; पण प्रत्यक्षात मुसलमान आपापसात ‘भाई भाई’ आणि इतर धर्मीय मात्र त्यांचा ‘चारा’, असाच प्रत्यक्षातील अनुभव आहे. वर्ष ७१२ मध्ये महंमद बिन कासिमने या देशावर सर्वांत पहिले आक्रमण केले. त्याने सिंधच्या दाहिर राजाचा पराभव करून त्यांच्या मुली आणि सहस्रो हिंदु स्त्रिया यांना गुलाम बनवले. लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या. त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केले. गुलाम बनवून नेलेल्या हिंदु स्त्रियांना आपल्या देशात नेऊन विकले. महंमद बिन कासिम नंतर या देशावर मुसलमानांच्या सतत टोळधाडी येत राहिल्या. प्रत्येकाने लाखो हिंदु स्त्री-पुरुषांच्या कत्तली केल्या, स्त्रियांवर बलात्कार केले, सहस्रो मंदिरे पाडली. मंदिरे पाडून मंदिराच्याच दगडांनी मशिदी बांधल्या, काही मशिदी तर मंदिराच्याच कोरीव स्तंभावर (पिलर) बांधल्या. भारताची अगणित संपत्ती लुटली. लाखो हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर केले.
ही सर्व अमानुष कृत्ये करतांना धर्मांधांच्या भाईचार्याचा किंवा विश्वबंधुत्वाचा यत्किंचितही अनुभव हिंदूंना आला नाही. केवळ हिंदूच नव्हेच, तर जगालाही ‘ईद’ या सणामध्ये म्हटल्याप्रमाणे धर्मांधांचा भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांचा कधी अनुभव आला नाही; कारण इस्लाम धर्माच्या स्थापनेपासून धर्मांध मुसलमानांची मानसिकता १४०० वर्षांपूर्वी होती, तशीच आजही कट्टर आहे.
५. सर्व जग इस्लाममय करण्याचा भयानक उद्देश बाळगणार्या संघटना !
या जगात मुसलमान धर्माच्या स्थापनेपासून अवघ्या १४०० वर्षांत ५७ इस्लामी राष्ट्रांची निर्मिती झाली. ‘ही निर्मिती भाईचार्याच्या आणि विश्वबंधुत्वाच्या आधारावर झाली का ?’, या प्रश्नाचे उत्तर प्रथम भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांच्या गप्पा करणार्यांनी द्यावे. एवढ्यावरही इस्लाम धर्माच्या अनुयायांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. ‘सर्व जग इस्लाममय करणे’, हाच एकमेव उद्देश समोर ठेवून या धर्मियांच्या अनुयायांचे आचरण असते. ‘दार-उल्-हरब’चे (मुसलमान अल्पसंख्य असणार्या प्रदेशाचे) रूपांतर ‘दार-उल्-इस्लाम’मध्ये (मुसलमान बहुसंख्य असणार्या प्रदेशामध्ये) करणे, हेच आपले आद्यकर्तव्य असल्याचे प्रत्येक मुसलमान मानतो. भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांच्या गप्पा मारणार्या या धर्माच्या अनुयायांनी इसिस, बोको हराम, अल कायदा, लष्कर-ए तोयबा, पी.एफ्.आय. अशा शेकडो जिहादी संघटनांची निर्मिती विविध देशांमध्ये केली आहे. यांपैकी १४५ जिहादी संघटनांची सूची माझ्याजवळ उपलब्ध आहे. अजूनही काही संघटना असू शकतील. या संघटनांची निर्मिती जगात शांती, भाईचारा, विश्वबंधुत्व निर्माण करण्यासाठी झालेली आहे का ? याचे उत्तर देण्याची आवश्यकता नाही; कारण सर्वांनाच ते ठाऊक आहे. या जिहादी संघटनांच्या आतंकवादी कृत्यांमुळे सर्व जग त्रस्त आणि अशांत आहे. भारतातील पी.एफ्.आय. या संघटनेने तर वर्ष २०४७ पर्यंत भारताला मुसलमान राष्ट्र बनवण्याचे आपले उद्दिष्टही जगजाहीर केले आहे.
आता तर शस्त्रे आणि अमली पदार्थ यांची अन् संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी महिला, तसेच लहान बालके यांचा वापर करण्याचा या आतंकवादी संघटनांचा धोकादायक कट उघडकीस आला आहे.
६. हिंदूंचे अस्तित्व समाप्त होण्याच्या मार्गावर !
बाँबस्फोट, आतंकवादी आक्रमण, जातीय दंगली यांसह लोकसंख्येचा विस्फोट करून भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचे प्रयत्न जोमाने चालू आहेत. वर्ष १९४७ मध्ये २ कोटी असणार्या मुसलमानांची लोकसंख्या आज ३० कोटींवर पोचली आहे. या देशातील केरळ, बिहार, बंगाल, आसाम ही राज्ये आणि ८५ जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत. विशेष म्हणजे आपल्या सणांचा उद्देश भाईचारा आणि विश्वबंधुत्व सांगणार्यांना आपल्या वस्तीत इतर धर्मियांचे अस्तित्वही सहन होत नाही. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे रहाणार्या हिंदूंचे अस्तित्व समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. जिवंत असणारे हिंदू जीव मुठीत धरून रहात आहेत.
७. पाकिस्तानमधून पलायन केलेल्या हिंदूंची व्यथा ऐका !
पाकिस्तानमधून राजस्थानात नुकत्याच पळून आलेल्या हिंदूंनी आपली व्यथा प्रकट करतांना सांगितले की, तेथील गरीब हिंदू हे मुसलमानांचे खानदानी गुलाम बनले आहेत. आमच्या लेकीसुना त्यांच्यासाठी खेळणी आहेत. वयात येणार्या मुलींना आम्हाला घरातच लपवून ठेवावे लागते. ९० टक्के मुसलमान असणार्या काश्मीरमधील मुसलमानांना शांततेने रहाणार्या १० टक्के हिंदूंचे अस्तित्व सहन झाले नाही. त्यांनी हिंदूंना नेसत्या वस्त्रानिशी हाकलून दिले. त्यांची भूमी, घरे यांवर नियंत्रण मिळवले. विरोध करणार्या हिंदूंच्या कत्तली केल्या, लेकीसुनांवर अमानुष बलात्कार केले. आजही भारतातील प्रत्येक गावातील मुसलमानबहुल वस्तीतील हिंदू आपापली घरे सोडून इतरत्र जात आहेत. हिंदूबहुल वस्तीत १-२ जरी मुसलमानांची घरे झाली, तरी तेथून हिंदूंना हळूहळू आपले बस्तान इतरत्र हलवावे लागते.
भाईचार्याच्या गप्पा करणार्या हिंदू नेत्यांनी आपली घरे एखाद्या मुसलमानबहुल वस्तीत बांधावीत आणि ‘मुसलमानांच्या भाईचार्याचा एकदा भरपूर आनंद घ्यावा’, असा माझा त्यांना सल्ला आहे.
८. काफीरांना ठार मारण्याचा संदेश देणार्या डॉ. झाकीर नाईक याचा निषेध न करणारे मुसलमान !
इस्लामी विचारवंत आणि धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक याने आपल्या भाषणात मुसलमानांना ‘काफीर दिसताच त्यांना ठार करावे’, असे अनेकदा आवाहन केले होते. यासाठी त्यांनी कुराणातील काही आयतांचा पुरावा दिला होता; पण भाईचार्याच्या गप्पा करणार्या एकाही मुसलमानाने त्यांचा निषेध केला नाही. मुसलमान जेव्हा काफीराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारतात, तेव्हा त्याला ‘जिहाद’ म्हणतात. पूर्वी हा जिहाद तलवारीने लढला जायचा. आता यात लव्ह जिहाद, मोबाईल गेमिंग जिहाद, लँड (भूमी) जिहाद, थूंक जिहाद, हलाल जिहाद अशा विविध जिहादांची भर पडली आहे.
९. भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांच्या गप्पा करणारे याविषयी काही बोलतील का ?
हिंदूंची नावे घेऊन, हातात गंडा घालून मुसलमान तरुणांकडून आजपर्यंत हिंदूंच्या सहस्रो मुली बाटवल्या गेल्या आहेत. या मुलींना एक तर इसिसमध्ये भरती करून आतंकवादी बनवण्यात आले किंवा त्यांचा ‘सेक्स वर्कर’ (संभोगासाठी गुलाम) म्हणून उपयोग करण्यात आला. ज्यांनी या गोष्टीला आणि धर्मांतर करण्यास नकार दिला, त्यांना अत्यंत क्रौर्यतेने ठार करण्यात आले. लँड जिहाद अर्थात् वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून मुसलमानांनी भारतातील लाखो एकर भूमी बळकावल्या आहेत. हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडून तिथे मशिदी उभारल्या आहेत. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील आणि काशी येथील श्री विश्वनाथाच्या मंदिरावरील मुसलमानांचे अतिक्रमण आंधळ्यालाही दिसावे इतके स्पष्ट आहे; पण भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांच्या गप्पा करणारे त्यावरील अधिकार सोडायला सिद्ध नाहीत. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरचे अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदूंना सतत ५०० वर्षे लढा द्यावा लागला आणि लाखो हिंदूंचे बलीदान द्यावे लागले, हे विसरता कामा नये.
१०. ख्रिस्ती, साम्यवादी आणि खान यांची पकड पूर्णपणे सुटणे महत्त्वाचे !
हिंदु मुलांना भ्रमणभाषच्या खेळाचे व्यसन लावून ४०० हिंदूंचे धर्मांतर करणार्या शहानवाजला नुकतीच अटक करण्यात आली आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंकडून कोट्यवधी रुपयांचा जणू ‘जिझिया कर’ वसूल केला जात आहे. एकंदरीत मुसलमानांचा भाईचारा आणि विश्वबंधुत्व यांची उदाहरणे सांगायची म्हटल्यास त्याचा शेवट कधीच होणार नाही. एक मात्र निश्चितपणे सांगता येईल की, या देशातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, इतिहास अन् हिंदी चित्रपटसृष्टीवरील ख्रिस्ती, साम्यवादी आणि खान यांची पकड अद्यापही ढिली झालेली नाही. ही पकड जोपर्यंत पूर्णपणे सुटणार नाही, तोपर्यंत हिंदूंना चुकीचे धडे आणि चुकीचा इतिहास शिकावाच लागेल.
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ (१५.६.२०२३)
संपादकीय भूमिकाशालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात खरा इतिहास शिकवण्यासाठी ख्रिस्ती, साम्यवादी अन् कथित निधर्मीवादी यांची व्यवस्था पालटणे आवश्यक ! |