योगी आदित्यनाथ यांना फ्रान्समध्ये पाठवल्यास २४ घंट्यांत सर्व काही ठीक होईल !

फ्रान्समधील हिंसाचारावर युरोपमधील एका ख्रिस्ती डॉक्टरची मागणी !

नवी देहली – फ्रान्समध्ये गेल्या ४ दिवसांपासून आफ्रिकी वंशांच्या धर्मांध मुसलमानांकडून प्रचंड हिंसाचार करण्यात येत आहे. पोलिसांवरही आक्रमणे केली जात आहेत. यात २०० हून अधिक पोलीस घायाळ झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ९०० हून अधिक जणांना अटक केली आहे. या प्रकरणी युरोपमधील एक डॉक्टर आणि प्राध्यापक असणारे एन्. जॉन कॅम यांनी ट्वीट करून भारताकडे मागणी केली आहे की, फ्रान्समधील हिंसाचार रोखण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवून द्या. ते २४ घंट्यांत सर्व काही ठीक करतील.

योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली प्रतिक्रिया !

डॉ. कॅम यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयानेही ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘जेव्हा जगात कुठेही हिंसा, दंगली होतात, अराजकता वाढते, कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येते, तेव्हा जग उपाय शोधते आणि उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिवर्तनकारी योगी पद्धतीची अपेक्षा करते.’

संपादकीय भूमिका

योगी आदित्यनाथ यांचा हा दरारा हिंदूंना कौतुकास्पदच होय ! या मागणीवरून हिंदूंनाच नव्हे, तर जगभरातील लोकांना धर्मांधांच्या हिंसाचारावर कसे नियंत्रण मिळवायचे ? हे योगी आदित्यनाथ यांच्या कृतीतून लक्षात आले आहे, हेच स्पष्ट होते !