‘गेम जिहाद’च्या माध्यमातून विवाहित हिंदु महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

  • तय्यब नावाच्या मुसलमानाने हिंदु महिलेशी ऑनलाइन मैत्री करून तिच्यात इस्लामविषयी निर्माण केली आवड !

  • महिलेने पूजा-अर्चा करणे, मंदिरात जाणे, कुंकू लावणे आदी सोडून दिले !

सीकर (राजस्थान) – येथे ‘ऑनलाइन गेमिंग’च्या माध्यमातून एका हिंदु महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघड आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

संबंधित महिलेला भ्रमणभाषवर खेळ खेळण्याची आवड आहे. ऑनलाइन खेळ खेळत असतांना तिची ओळख तैय्यब नावाच्या मुसलमानाशी झाली. त्याने तिच्याशी मैत्री करून तिला इस्लामविषयी माहिती द्यायला आरंभ केला. तिला व्हॉट्सअ‍ॅपवरील इस्लामसंबंधी गटांमध्ये जोडले. यासह उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी नमाजपठणाच्या पद्धती पाठवण्यासही आरंभ केला. महिलेलाही इस्लाम, तसेच त्यातील चालीरिती यांविषयी आवड निर्माण झाली. तय्यबने तिला मुसलमान नावाने हाक मारण्यास आरंभ केला.

मधल्या काळात महिलेचा पती नोकरीसाठी विदेशात गेला. त्यामुळे ती महिला तिच्या माहेरी आली. तिचे कुटुंबीय तिच्या राहणीमानात झालेले पालट पाहून आश्‍चर्यचकित झाले. तिने टिकली, कुंकू लावणे, तसेच पूजा-अर्चा करणे, मंदिरात जाणे इत्यादी सोडून दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिच्या कपड्यांमध्ये बुर्का असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. तिच्यावरील संशय बळावल्यावर एके दिवशी तिच्या भावाने तिचा भ्रमणभाष तपासला असता सर्व सत्य समोर आले. कुटुंबियांनी चौकशी केल्यावर समजले की, महिलेला तय्यब आवडू लागला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली आहे. त्यामुळेच धर्मांध मुसलमान नवनवीन क्लृप्त्या योजून हिंदूंचा सहज बुद्धीभेद करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात घ्या !