पेशावर (पाकिस्तान) – गेल्या २ दिवसांत पेशावरमध्ये शिखांवर आक्रमण करण्याच्या २ घटना घडल्या आहेत. यांत १ जण ठार झाला, तर १ जण घायाळ झाला आहे. ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत’ या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व घेतले आहे. मनमोहन सिंह (वय ३४ वर्षे) असे मृत शिखाचे नाव आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील याकूत भागात दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी मनमोहन सिंह यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पाकिस्तान के पेशावर शहर में कुछ अज्ञात बंदूकधारियों ने एक सिख व्यक्ति की गोली मारकर हत्या कर दी. पाकिस्तान में अल्पसंख्यों पर हमले काफी बढ़ गए हैं-#Crime #PakistanSikhMurder #Peshawar #Pakistan https://t.co/H2d7sqcg5g
— ABP News (@ABPNews) June 25, 2023
या घटनेच्या आदल्या दिवशी पेशावरच्या रशीद गढी भागातील शीख दुकानदार तरलोक सिंह यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या आतंकवाद्यांनी गोळीबार केला होता. तरलोक सिंह यांच्या पायाला गोळी लागली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले.
संपादकीय भूमिकापाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ? |