अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना विशेष ‘टी शर्ट’ भेट

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक विशेष ‘टी शर्ट’ भेट दिला आहे. या टी शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडेन यांनी दिलेल्या टी शर्टवर लिहिले आहे, ‘भविष्य ‘एआय’चे आहे, इंडिया अँड अमेरिका.’ पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले की, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय – आर्टिफिशियल इंटेलिजन्स) असो किंवा भारत-अमेरिका (एआय), भविष्य ‘एआय’चे आहे. जेव्हा आम्ही एकत्रित काम करतो, तेव्हा दोन्ही राष्ट्र सशक्त होतात. ही दोन राष्ट्रे एकत्र काम करतात, तेव्हा जगालाही त्याचा लाभ होतो.