गुजरातमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ धर्मांध मुसलमानांना अटक

एका महिलेचा समावेश !

गांधीनगर (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ जणांना पोरबंदर येथून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.

पथकाने माहिती देतांना सांगितले की, या प्रकरणी सूरतमधील सुमेरा नावाच्या महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चौघेही इस्लामिक स्टेटच्या सक्रीय गटाचे सदस्य आहेत. हे चौघेही इस्लामिक स्टेटसमवेत कारवाया करण्यासाठी देशातून पळून जाण्याच्या सिद्धतेत होते. हे सर्वजण एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते.