हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर चढवा ! – धनराज जगताप, हिंदु महासभा

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सातारा, ७ जून (वार्ता.) – गतवर्षी देहलीची श्रद्धा वालकर, तर झारखंड येथील रबिका पहाडन यांची अनेक तुकडे करून हत्या करण्यात आली. तरीही हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून हत्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. देहली येथे साक्षी नावाच्या हिंदु युवतीला साहिल खान नावाच्या मुसलमान युवकाने २५ वेळा चाकूने भोसकून आणि ३ वेळा दगडाने ठेचून अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फाशी द्या, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, अशी मागणी सातारा येथील अखिल भारतीय हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त ते बोलत होते.

या वेळी दशनाम जुना आखाड्याचे संत पू. सोमनाथगिरी महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच विश्व हिंदु परिषदेचे माजी शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, अखिल भारतीय हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, कार्यकारणी सदस्य उमेशजी गांधी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री योगेश कापले, अक्षय बर्गे, धर्मप्रेमी वैभव पिसाळ, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक, सौ. भक्ती डाफळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आंदोलनामध्ये सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्रीमती प्रतिभा महामुनी यांनी केले. आंदोलन संपल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले.