(म्हणे) ‘गांधीजींना लाज वाटेल !’  – काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा थयथयाट  

मुसलमान दुकानदारांना ‘लव्ह जिहाद’वरून दुकाने बंद करण्याची चेतावणी दिल्याचे प्रकरण !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर

नवी देहली – उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथे मुसलमान दुकानदाराने केलेल्या लव्ह जिहादच्या घटनेनंतर स्थानिकांनी तेथील मुसलमान दुकानदारांना १५ जून पर्यंत दुकाने रिकामी करून निघून जाण्यास सांगणारी भित्तीपत्रके लावली आहेत. यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्वीट करत टीका केली आहे. ‘हे भयानक आहे. आपण निर्माण केलेल्या भारताची गांधीजींना लाज वाटेल’, असे त्यांनी म्हटले आहे. उत्तरकाशीमध्ये मुसलमानांची ३० ते ३५ दुकाने आहेत.

संपादकीय भूमिका 

  • आजन्म मुसलमानांचे लांगूलचालन करणारे म. गांधी हयात असते, तर त्यांनी ही चेतावणी ऐकून लाज वाटली असती, यात शंका नाही, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?
  • लव्ह जिहादविषयी नाही, तर दुकाने बंद करण्याची चेतावणी दिल्यावर तोंड उघडणारे शशी थरूर यांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारले पाहिजे !