अलीगड (उत्तरप्रदेश) – येथे दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी महंमद हसन उर्फ पप्पू याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या खटला ४१ दिवसांत निकालात काढण्यात आला. महंमद हसन हा वर्षभर या मुलीवर बलात्कार करत होता. हसन याला शिक्षा सुनावल्यानंतर मुलीला नारी निकेतनमध्ये पाठवण्यात आले आहे. हसन हा ५० वर्षांचा असून त्याला ४ मुले आहेत.
अ. ८ वर्षांपूर्वी हसन याने एका हिंदु मजुराच्या मुलीला दत्तक घेतले. तिला घरी आणले आणि तिचे इस्लामी नाव ठेवले. मागील वर्षभर तो त्या मुलीवर बलात्कार करत होता. २५ ऑक्टोबर २०२२ या दिवशी हसन याच्या सुनेने त्याला मुलीवर बलात्कार करतांना पाहिले. त्यानंतर तिने आरडाओरडा केला.
Aligarh: Mohammad Hassan sentenced to 20 years in jail under POCSO Act for raping his adopted minor daughterhttps://t.co/LZASee8xEY
— OpIndia.com (@OpIndia_com) May 17, 2023
आ. याची माहिती मिळताच मोहन चौहान नामक एका समाजसेवकाने हसन याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.
इ. या वेळी पुरावे आणि मुलीने दिलेली साक्ष यांवरून हसन याचा गुन्हा सिद्ध झाला. त्याला २० वर्षांचा कारावास आणि ५० सहस्र रुपयांचा दंड सुनावण्यात आला.
संपादकीय भूमिका
|