‘रामनाथी आश्रमात शिबिराला जावे’, असा विचार मनात येणे आणि गुरुकृपेने परीक्षा पुढे गेल्याने आश्रमात जाता येणे

श्री. वैभव गुर्रम

‘२०.२.२०२३ या दिवशी माझी परीक्षा होती आणि त्याच कालावधीत रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात ५ दिवसांचे एक साधनेविषयी शिबिर होते. परीक्षा असल्यामुळे ‘आता मी आश्रमात कसे जाणार ?’, असा विचार माझ्या मनात येत होता. ‘एक पेपर न देता आपण आश्रमात जाऊया’, असाही विचार माझ्या मनात येत होता; पण परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे अकस्मात् माझी परीक्षा पुढे ढकलली गेली. त्यामुळे मला आश्रमात जाता आले.’ – श्री. वैभव गुर्रम, सोलापूर (२६.१.२०२३)