‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘श्रीसत्शक्ति ( सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे त्यांच्या व्यस्ततेमुळे मार्गदर्शन मिळायला वेळ लागतो. अशा वेळी मी त्यांना माझ्या मनाची स्थिती आत्मनिवेदन करून साधनेचे प्रयत्न करतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘अनेक साधकांना श्रीसत्शक्ति ( सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी त्यांच्या व्यस्ततेमुळे बोलायला वेळ लागत असल्यामुळे ‘कसे प्रयत्न करायचे ?’, हे शिकता येण्यासाठी लिहून दे.’’ ती सूत्रे येथे दिली आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडून साधनेविषयी मार्गदर्शन घेण्यास सांगणे
‘१०.३.२०१५ या दिवशी पू. भगवंत कुमार मेनराय (सनातनचे ४६ वे समष्टी संत, वय ८४ वर्षे) आणि पू. (कै.) सौ. सुरजकांता मेनराय (सनातनच्या ४५ व्या समष्टी संत, वय ७७ वर्षे) यांचा संतसन्मान सोहळा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत झाला. या सोहळ्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याशी साधनेतील अडचणींविषयी बोलत जा’, असे सांगितले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे साधनेसाठी मार्गदर्शन घेऊन त्यानुसार प्रयत्न करणे; परंतु नंतर त्यांचे मार्गदर्शन घेणार्या साधकांची संख्या वाढल्यामुळे स्वतःऐवजी अन्य साधकांना प्राधान्य देणे
त्यानंतर ‘साधनेच्या अनुषंगाने प्रयत्न कसे करायचे ? किंवा मी कुठे अल्प पडतो ?’, यासाठी मी आवश्यकतेनुसार अधूनमधून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे मार्गदर्शन घेऊन त्यानुसार प्रयत्न करत असे; मात्र कोरोनाच्या कालावधीपासून त्यांची साधकांना मार्गदर्शन करण्याची व्यस्तता वाढली. हे लक्षात घेऊन मी ‘अन्य साधकांच्या साधनेतील अडचणी किंवा त्यांना होणारे आध्यात्मिक त्रास’, ही सूत्रे सांगण्यासाठी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा मी माझ्या साधनेविषयी असणार्या अडचणी त्यांना विचारत नसे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आत्मनिवेदन केल्यावर ‘मनात येणारे विचार योग्य आहेत ना ?’ याची आध्यात्मिक मित्राकडून निश्चिती करून त्यानुसार कृती करणे
‘साधनेची दिशा कशी असावी ?’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दिशादर्शक विधाने किंवा ‘साधनेचे प्रयत्न कसे करायचे ?’, याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आठवत असे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना साधनेच्या अनुषंगाने मनाची स्थिती आत्मनिवेदन केल्यावर मी मनात येणार्या विचारांनुसार कृती करू लागलो. काही वेळा आत्मनिवेदन केल्यानंतर ‘माझ्या मनात आलेला विचार योग्य आहे का ?’, हे पहाण्यासाठी मी माझ्या आध्यात्मिक मित्राशी बोलून निश्चिती करू लागलो.
४. कृतज्ञता
मला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना द्यावा लागणारा वेळ वाचून तो समष्टीतील अन्य साधकांना मिळू लागला; म्हणून मला कृतज्ञता वाटली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आधी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला आध्यात्मिक दिशा मिळत असल्याची अनुभूतीही येऊ लागली. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनामुळेच माझे साधनेचे प्रयत्न होऊ शकत आहेत’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– एक साधक, (१३.२.२०२३)
|