१. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना चैतन्यमय धाग्याने बांधून ठेवल्याचे जाणवणे
‘आठवड्यातून एकदा गुरुवारी होणार्या भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना एक प्रकारे चैतन्यमय धाग्याने बांधूनच ठेवले आहे. ‘कुणी कुठेही असला किंवा कुणी वाट चुकला असेल (साधनेपासून दूर गेला असेल), त्याला हा चैतन्याचा धागा (स्पर्श न करता) नकळत बांधूनच ठेवतो’, असे मला जाणवले.
२. प्रसारातील साधकांना चैतन्यमय सत्संगातून साधनेसाठी प्रेरणा मिळणे
कोरोनामुळे प्रसारातील साधक पूर्वीप्रमाणे आश्रमात येऊ शकत नव्हते. त्या वेळी आश्रमातून घरी गेल्यावर त्यांना सेवा करण्यास जशी प्रेरणा मिळत असे, तशीच प्रेरणा त्यांना हा भक्तीसत्संग ऐकल्यावर साधनेसाठी मिळते. हे साधक गुरुवारच्या चैतन्यमय सत्संगातून प्रेरणा घेऊन त्यानुसार साधनेचे प्रयत्न करत असतात. आता या भक्तीसत्संगामुळे देवाने या कोरोनाच्या महामारीतही साधकांचे जीवन सुसह्य केले आहे आणि ते आध्यात्मिक जीवन जगत आहेत.
३. गुरुवारचा भक्तीसत्संग उच्च स्तरावरचा असणे आणि त्यामुळे साधनेला पूरक वातावरण निर्माण होऊन दिशा मिळणे
गुरुवारच्या भक्तीसत्संगामुळे साधकांच्या साधनेला पूरक वातावरण निर्माण होऊन त्यांना दिशा मिळत आहे. ‘हे भक्तीसत्संग उच्च स्तरावर चालू आहेत’, असे जाणवते. ‘हे भक्तीसत्संग संपूच नयेत’, असे सर्वांना वाटते. ‘देवाने सत्संगाच्या माध्यमातून पोकळी निर्माण करून त्या पोकळीत साधकांना ठेवले आहे आणि त्यांच्याकडून तो साधना करवून घेत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे साधकांना ‘कुणी (अनिष्ट शक्ती) स्पर्श करू शकत नाही’, असेही मला जाणवले.
४. भक्तीसत्संगामुळे साधिकेला जिवंत असल्याचे वाटणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकल्यावर ‘देवीच बोलत आहे’, असे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई, गुरुवारी होणार्या भक्तीसत्संगामुळे माझा श्वास चालू आहे आणि मी जिवंत आहे’, असे मला वाटते. एकदा सत्संगात मला तुमचा आवाज प्रतिध्वनीप्रमाणे ऐकू येत होता. तेव्हा ‘देवीच बोलत आहे’, असे मला जाणवले.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |