१. संतपदी विराजमान झाल्यावर जन्मतिथी समजणे
‘६.११.२०२२ या दिवशी माझा वाढदिवस झाला. मला माझी जन्मतिथी ठाऊक नव्हती. त्यामुळे माझा वाढदिवस दिनांकानुसार साजरा केला गेला. गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान करून माझे ‘मीपण’ संपवून पूज्य बनवले. त्यानंतरच गुरुकृपेने माझ्या भावाच्या माध्यमातून मला माझी जन्मतिथी कळली. ही माझ्यासाठी गुरुदेवांची कृपाच आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सान्निध्यात आणि सद्गुरु, संत अन् साधक यांच्या सहवासात प्रथमच वाढदिवस साजरा होणे
५९ वर्षांत माझा प्रथमच वाढदिवस साजरा केला. श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या सान्निध्यात आणि सद्गुरु, संत आणि साधक यांच्या सहवासात माझा वाढदिवस साजरा झाला. तेव्हा ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) मला लहान, म्हणजे एक वर्षाचीच बनवले’, असे मला वाटले. पू. दीक्षितआजींनी मला भेट देऊन माझ्यावर आनंदाची उधळण केली. ती भेट म्हणजे ‘गुरुदेव, सद्गुरु, संत आणि साधक यांची प्रीती असून समष्टीसाठी दिलेला चैतन्याचा स्रोत अन् कृपाशीर्वाद आहे’, असे मला वाटले. त्या वेळी ‘गुरुदेवा, मला सतत लहान बनूनच रहायचे आहे. सतत चिकाटी आणि सातत्य ठेवून तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करून घ्या’, अशी प्रार्थना झाली.
३. वाढदिवसानिमित्त गुुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करणे
गुरुदेव, तुम्ही मला जे दिले, ते मला शब्दांत मांडण्यासारखे नाही; पण कृतज्ञतापुष्प अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘मला अखंड शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे. तुम्ही मला तुम्हाला अपेक्षित असेच घडवले. तुम्ही मला जे जे दिले, ते मला समष्टीला देता येऊ दे. माझे सर्वस्व, माझा प्रत्येक श्वास समष्टीसाठी समर्पित होऊ दे. माझे प्रयत्न अल्प पडत आहेत. तुम्हीच मला तुमच्यासारखे घडवा ! तुम्हीच मला आतापर्यंत सांभाळले. यापुढेही तुम्हाला अपेक्षित असेच प्रत्येक श्वासात तुमचे स्मरण असू दे. तुम्ही दिलेल्या प्रकाश मार्गावरून मला अखंड तुमचे बोट धरून चालता येऊ दे. गुरुकार्यासाठी अखंड तळमळत असलेली तुमची लहान बालसाधिका शरणागतभावाने प्रार्थनेच्या रूपात कृतज्ञतापुष्प अर्पण करते. कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !’, अशी प्रार्थना करतांना ‘शुभेच्छा, शुभेच्छा !’, हे गुरुदेवांचे शब्द माझ्या कानी पडले.
४. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिलेला प्रसाद म्हणजे ‘चैतन्याचा गोळाच दिला आहे’, असे वाटून ‘तो प्रसाद समष्टीला द्यावा’, असे वाटणे
वाढदिवसाच्या दिवशी प्रत्यक्ष वैकुंठामध्ये असलेल्या श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. त्यांच्या खोलीत गेल्यावर ‘मी प्रत्यक्ष देवीमातेचे दर्शन घेत आहे, त्यांची प्रेमळ दृष्टी माझ्यावर पडताच त्यांच्याकडून प्रकाशाचा झोत येऊन माझी प्रत्येक पेशीपेशी चैतन्यमय झाली आहे’, असे मला जाणवले. श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी मला प्रसाद दिल्यावर ‘त्या प्रसादातून मोठा चैतन्याचा गोळाच दिला’, असे वाटले. ‘हा प्रसादरूपी ठेवा समष्टीला द्यायचा आहे आणि मी संपूर्ण समष्टीला चैतन्य अन् आनंद द्यायचे आहे’, असे वाटून माझे मन शांत झाले.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वाक्य ऐकून ‘त्यांचा कृपाशीर्वाद मिळाला’, असे वाटणे
समष्टी सेवा करण्यासाठी श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी मला चैतन्य, ऊर्जा, शक्ती आणि बळ दिले. तेव्हा माझ्यासह देवताही ‘ओंजळीतील सुगंधी पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करत आहेत’, असे वाटून प्रार्थना झाली. ‘हे बिंदाई, तूच मला तुझ्यासारखे घडव.’ तेव्हा ताई मला म्हणाल्या, ‘‘पुढे सगळे छान होईल !’’ हा माझ्यासाठी त्यांनी दिलेला कृपाशीर्वाद आहे. माझे प्रयत्न समष्टीत शिकून गुरुदेवांना अपेक्षित असे होऊ दे.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या भेटीच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. श्रीसत्शक्ति बिंदाताई यांच्या प्रीतीमुळे त्या सेवेत व्यस्त असूनही साधकांना वेळ देऊन त्यांची कुटुंबाप्रमाणे विचारपूस करतात. त्या साधकांच्या साधनेतील अडचणी समजून घेऊन साहाय्य करतात. यावरून त्यांची प्रत्येक साधकाप्रती असलेली प्रीती शिकायला मिळाली.
आ. त्या त्यांच्या कक्षामध्ये बसल्या असतांना ‘प्रत्यक्ष देवी मंिदरात बसली आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘त्या शांत बसलेल्या दिसत होत्या आणि त्यांच्यातील चैतन्य सर्वत्र पसरले असून ते चैतन्य आपोआपच गुरुमाऊलींचे समष्टी कार्य करत आहे’, असे मला जाणवले.
ई. प.पू. गुरुमाऊलींना भेटल्यावर किंवा सत्संगातून आल्यावर जसा आनंद होतो, तसाच आनंद श्रीसत्शक्ति बिंदाताई यांना भेटल्यावर अनुभवता आला. त्या दिवशी मला रात्रभर झोप लागली नाही.
उ. ‘श्रीसत्शक्ति बिंदाताई परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी एकरूप झाल्या आहेत’, हे मला शिकता आणि अनुभवता आले.
ऊ. ‘श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी मला कुशीतच घेतले आहे’, असा आनंद मी अनुभवला.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात ‘अध्यात्मशास्त्र उच्च कोटीचे आहे !’, याची अनुभूती येणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा हात हवेमध्ये एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे फिरवल्यावर त्यांच्या हाताचा सूक्ष्म स्पर्श होत आहे आणि संपूर्ण देहामध्ये चैतन्य पसरत आहे, असे जाणवून मला शरिरामध्ये गारवा जाणवला. त्यांच्याच कृपेमुळे वायुतत्त्वाची अनुभूती घेता आली. ‘अध्यात्मशास्त्र उच्च कोटीचे आहे !’, हे त्यांच्याच कृपेमुळे मला अनुभवता आले. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे, सनातनच्या ११९ व्या संत), फोंडा, गोवा. (२०.१२.२०२२)
|