स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या युद्धसज्जतेच्या संदर्भातील द्रष्टेपण !

‘जेव्हा देशाची फाळणी झाली, तेव्हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न भंगले; मात्र त्यांनी त्यासंबंधी अत्यंत दु:खाने केलेले भाकीत खरे ठरले. ‘शस्त्रबळ वाढवा, प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्धशास्त्र शिकून घ्या’, अशी शिकवण सावरकर यांनी लेखणीने आणि वाणीने सतत दिली. त्या वेळी त्यांच्यावर टीका झाली. ‘रिक्रूटवीर’ (भरतीवीर) म्हणून त्यांची कुचेष्टा करण्यात आली; पण वर्ष १९६२ मध्ये चीनचे सत्य आणि क्रूर स्वरूप जेव्हा प्रकट झाले, तेव्हा अनेकांना सावरकर यांच्या द्रष्टेपणाची ओळख पटू लागली. सैन्यसामुग्री वाढवण्याची घोषणा तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना करावी लागली. केंद्र सरकारलाही ती पटू लागली. वर्ष १९६५ मध्ये भारतीय सैन्याने जेव्हा पाकिस्तानवर एका मागून एक विजय मिळवले, तेव्हा रुग्णशय्येवर असलेल्या या पुरुषश्रेष्ठाच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.’

(साभार : ‘सावरकर इतिहास दैनंदिनी’)

– दादुमिया (साभार : स्वातंत्र्यवीर – दिवाळी विशेषांक २०१६)