३८ सहस्र ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्याचा संकल्प करूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

खालील वृत्त रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

‘हिंदु धर्म, हिंदु समाज, हिंदु संस्कृती, तसेच हिंदुस्थान या गोष्टींसाठी वाहिलेले एकमेव वर्तमानपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ होय ! हे वर्तमानपत्र प्रत्येक हिंदूने वाचले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, व्यक्ती यांच्यापर्यंत ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे.

हिंदु धर्माची सध्याची स्थिती काय आहे ? हिंदु समाजावर सध्या कोणत्या प्रकारची संकटे आहेत ? ते हिंदूंना कळले पाहिजे, यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ पोचले पाहिजे. त्यासाठी ३८ सहस्र ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात प्रत्येक हिंदूच्या घरात दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू करायचा आहे, यासाठी संकल्प करूया.’ (२.२.२०२३)