आळंदीसारख्या पवित्र ‘तीर्थस्थळी’ गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्त केले जात आहे. येशूचे रक्त पाजून लोकांचे ‘सगळे रोग, आजार आणि कष्ट संपतील’, असे सांगत हिंदूंचे धर्मांतर केले जात होते; पण प्रत्यक्षात येशूच्या रक्ताच्या नावाखाली द्राक्षांचा रस पाजल्याची घटना समोर आली आहे. अशिक्षित, तसेच गरीब हिंदूंना पैशांंचे आमीष दाखवायचे आणि त्यांच्या दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडायचे, असा प्रकार सध्या सर्रास घडत आहे. प्रशासनही याकडे पाहिजे तितक्या गांभीर्याने पहात नाही, हे दुर्दैवी आहे. हिंदूंनीही अशा प्रकारच्या आमिषांना न भूलण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
या सर्व प्रकारासाठी विदेशातून पैसा पुरवला जात आहे, हे वेगळे सांगायला नको. हिंदूंंचे धर्मांतर करायचे आणि ही संख्या वाढल्यावर स्वतंत्र राज्याची मागणी करायची येथपर्यंत मजल या ख्रिस्ती मिशनर्यांची गेलेली आहे. भारताचे तुकडे करून त्यांच्यावर ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’, या इंग्रजांच्या कूटनीतीप्रमाणे मिशनरी काम करत आहेत. इंग्रज भारत सोडून गेले, तरी त्यांची मानसिकता येथेच सोडून गेले आहेत. याला ‘निधर्मी कार्यप्रणाली’ कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
धर्मांतर झाल्यानंतर फक्त एक हिंदु आपल्या धर्मातून जातो, असे होत नाही, तर हिंदूंंचा एक शत्रू वाढतो. मूळ ख्रिस्ती असलेल्या लोकांपेक्षा धर्मांतरित झालेले अधिक कडवट असतात, तसेच ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे. धर्मांतरित हे अस्तनीतील निखार्याप्रमाणे असतात. हिंदूंंनी ‘धर्मांतर हे महापाप आहे’, हे समजून घेतले पाहिजे आणि छोट्या छोट्या आमिषांना भूलल्यामुळे येणार्या अनेक पिढ्यांची हानी होण्यापासून टाळले पाहिजे.
विश्वाच्या निर्मितीपासूनच हिंदु धर्म आहे. अशा अतीउच्च वैदिक परंपरेचे आपण पाईक आहोत. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. २ सहस्र वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या धर्मामध्ये धर्मांतरित होण्याआधी आपण विचार केला पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेताजी पालकरांना विधीवत् हिंदु धर्मात पुन्हा आणले, त्याचप्रमाणे जे हिंदु अज्ञानामुळे धर्मांतरित झाले आहेत, अशांना पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी साहाय्य केले पाहिजे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. यासह शासनस्तरावर धर्मांतर बंदी कायदा करून बळजोरीने किंवा आमीष दाखवून धर्मांतर करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना कायद्याचा बडगा दाखवून कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, असेच समस्त हिंदूंना वाटते !
– श्री. जयेश बोरसे, पुणे