कल्याण येथील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत बिबट्याच्या आक्रमणात एक जण घायाळ !

ठाणे, २९ जानेवारी (वार्ता.) – मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील एका घरात २६ जानेवारीच्या मध्यरात्री बिबट्या शिरला. त्याच्या आक्रमणात पप्या (वय ३४ वर्षे) हा तरुण घायाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पप्याचे कुटुंबीय रात्री झोपी गेले होते. त्यांच्या घराला दरवाजा नाही. त्यामुळे बिबट्या घरात शिरला. बिबट्याने तरुणाच्या चेहर्‍यावर आक्रमण केले; पण त्याच्या पत्नीने काठीने बिबट्यावर त्वेषाने आक्रमण केल्याने बिबट्या तेथून पळून गेला.

सौजन्य इन डिजिटल मराठी